निगडी :-ज्ञानदीप विद्यामंदीराचे उपशिक्षक सचिन एकनाथ माळशिकारे यांचे निधन.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे :-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
ज्ञानदीप विद्यामंदीराचे उपशिक्षक सचिन एकनाथ माळशिकारे यांचे निधन.
निगडी, दि. 27 (शफिक शेख) – रूपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप विद्यामंदीर रूपीनगर येथे मागील अनेक वर्षांपासून उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले सचिन माळशिकारे यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले.
मागील अनेक वर्षांपासून सचिन सर हे ज्ञानदीप विद्यामंदिरामध्ये कार्यरत होते. एक शिक्षक म्हणून सर्व विद्यार्थ्यांमध्ये ते प्रिय होते. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्रात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. सचिन सरांच्या जाण्याने संपूर्ण पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
ज्ञानदीप विद्यामंदीराचे मुख्याध्यापिका नवले मॅडम आणि त्यांचे सहकारी वर्गशिक्षक यांच्याकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.