सातारा:-(वाई)-खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयात वाई विधानसभा ओबीसी सेल अध्यक्ष सागर पवार यांचा झंझावात.
पत्रकार अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अशितोष चव्हाण
RPS STAR NEWS
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयात वाई विधानसभा ओबीसी सेल अध्यक्ष सागर पवार यांचा झंझावात.
वाई- सातारा लोकसभा मतदारसंघात अटीतटीच्या झालेल्या खासदार निवडणुकीत पक्ष कार्यकर्त्यानी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या गळ्यात।खासदार कीच्या विजयाची माळ पडली राजे प्रेमी व भाजप पक्ष कार्यकर्त्यांनी शिव छत्रपतींच्या गादीचा मान व सन्मान राखत छत्रपती उदयनराजे भोसलेंना देशाच्या संसदेत पाठवले सातारा लोकसभा खासदार निवडणुकीत वाई विधानसभा ओबीसी सेलचा झंझावाती प्रचार महाराजांच्या विजयात मैलाचा दगड ठरला आहे वाई विधानसभा अध्यक्ष सागर विलास पवार यांनी कार्यकर्त्यांच्या साथीने निवडणूक प्रचारा दरम्यान मतदारसंघा तील जन माणसांच्या मनामनात भाजप विचाराचे वादळ उभे करत छत्रपतींच्या विजयात खारीचा वाटा उचलला लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप पक्षाच्या वरिष्ठांनी सागर पवार यांच्यावर वाई विधानसभा ओबीसी सेल अध्यक्षपदाची धुरा व प्रमुख जबाबदारी सोपवली होती त्याचवेळी सागर पवार यांनी दैनिक सत्य सह्याद्रीशी बोलताना वाई विधानसभा मतदारसंघात भाजप विचाराचे वादळ आणणार असा शब्द पक्षाच्या नेत्यांना दिला होता पक्षाने जबाबदारी दिलेल्या दिवसापासून सागर पवार यांनी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील कार्यकर्त्यांना सोबत घेवून भाजप पक्षाचे विचार तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्या साठी पायाला भिंगरी बांधत संपूर्ण वाई विधान सभा मतदारसंघात झंझावाती दौरे केले भारतीय जनतेप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाची गॅरंटी,बॉरंटी व पक्षाचे कमळ चिन्ह घराघरात पोचवले याचा फायदा होवून सातारा लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे कमळ फुलवता आले पक्षातील सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने वमदतीने महाराजांच्या विजयाचा गुलाल उधळण्याचे यश सागर पवार व ओबीसी सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यां ना मिळाले वाई शहरा बरोबरच वाई शहरातील मिनी नगरपालिका यशवंतनगर ग्रामपंचायत मधील सर्व प्रभागामध्ये महायुतीच्या पदाधिकारी।मित्रांना सोबत घेत ओबीसी सेल अध्यक्ष सागर पवार यांनी छत्रपती उदयनराजे भोसले सर्वाधिक मताधिक्य मिळवून देत महाराजांच्या विजयाचा गुलाल उधळला
फोटो- विजयानंतर महाराज साहेबांचे अभिनंदन करताना अध्यक्ष सागर पवार.