वाई:- नगर पालिकेच्या स्वच्छतागृहांच्या कामात भ्रष्टाचार – BSP चे मुख्याधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी – जिल्हा सचिव प्रणित मोरे.
पत्रकार आशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आशितोष चव्हाण
RPS STAR NEWS
वाई:- नगर पालिकेच्या स्वच्छतागृहांच्या कामात भ्रष्टाचार – BSP चे मुख्याधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी – जिल्हा सचिव प्रणित मोरे.
वाई शहरात ठिकठिकाणी असलेल्या मुतारीच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईबाबत.
वाई नगरपरिषद अंतर्गत वाई शहर हद्दीत ठिकठिकाणी मुतारीची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुताऱ्यांमध्ये पाण्याची व्यवस्था नसतानाही तेथे पाईपलाईन करून टेंडर रक्कम खर्च फुगवण्याचे काम ठेकेदाराने केल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुताऱ्यांमध्ये पाण्याची सोय नसतानाही पाईपलाईन करून मुद्दामून जास्त खर्च दाखवण्यात आलेला आहे. संबंधित टेंडर फुगवण्याचे काम अधिकाऱ्यांच्या निदर्शनात असूनही अशा कामाला काम पूर्णत्वाचा दाखला परिषदेकडून मिळतोच कसा हा प्रश्न उद्भवत आहे. तरही सदर काम करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून सदर कामास काम पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशाप्रकारे जनतेच्या पैशातून भोंगळ कामे होणार असतील तर त्याचा विरोध वारंवार केला जाईल हे लक्षात घ्यावे व जिथे पाण्याची सोय नाही अशा ठिकाणी फक्त आणि फक्त स्वतःचे खिसे गरम करण्यासाठी ठेकेदार व अधिकारी यांनी संगणमत करून पाईपलाईन बसवली आहे व टेंडर फुगवले आहे तर हे आपण लवकरात लवकर या विषयावर कारवाई करावी अन्यथा आम्हाला वाई नगर परिषदेत येत्या वीस दिवसानंतर आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा BSP चे सातारा जिल्हा सचिव प्रणित मोरे यांनी दिला आहे.