आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात अडीचशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

सातारा जिल्ह्यात अडीचशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार.

सातारा दि: शुक्रवार दिनांक ३१ मे म्हणजे महिना अखेर पण, याच दिवशी सातारा जिल्ह्यातील केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय- निम शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस म्हणून चांगलाच गाजला. पूर्वी शाळा प्रवेशासाठी दिनांक एक जून ही जन्मतारीख म्हणजे वाढदिवस असे समीकरण झाले होते. आज या समीकरणाची शेवटची पिढी म्हणून काहींचा सेवानिवृत्ती निमित्त सातारा जिल्ह्यात सुमारे अडीचशे सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचाऱ्यांचा विविध कार्यालयात सत्कार करण्यात आला. काँग्रेसच्या राजवटीमध्ये १९८० साली तात्कालीन मुख्यमंत्री शंकर राव चव्हाण यांनी महाराष्ट्रात प्रथमच झिरो बजेट आणल्यामुळे शासकीय सेवेत कपात करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा शासकीय सेवेत भरती झाली. आता त्यावेळी भरती झालेली पिढी आता सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहे. त्यामुळे ३१ मे रोजी सातारा जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयात सेवानिवृत्तीचा सोहळा पाहण्यास मिळाला.
सातारा जिल्ह्याचा विचार केला तर शासकीय- निमशासकीय व अनुदानित अशा विविध संस्था आहेत .या संस्थेमध्ये ३१ मे या दिवशी ज्यांची सेवा निवृत्ती झाली आहे. अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी सापत्नीक सत्कार करून त्यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच दीर्घ आयुष्य लाभो. अशी शुभकामना केली आहे.
यामध्ये पोलीस , नगर पालिका,नगरपंचायत,पंचायत समिती सातारा जिल्हा परिषद, पाटबंधारे ,आरोग्य, शिक्षण, महसूल, विमा तसेच विविध केंद्र व राज्य सरकारच्या अनेक कार्यालयात आज सकाळपासूनच सेवानिवृत्ती निमित्त सोहळा व त्यानिमित्त स्नेह भोजन असे भरगच्च कार्यक्रम झाले.
अलीकडच्या नव्या पिढीतील अनेक जण शासकीय सेवेत असले तरी काहींना कंत्राटी पद्धतीने तर काहींना विना सेवानिवृत्ती वेतनावर काम करावे लागणार आहे. याबद्दलच्या परिस्थितीनुसार आता सेवानिवृत्तीचा काळ सुखाचा असे म्हणण्याची पाळी आता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याकडे पाहून म्हणावे लागत आहे. आता सेवानिवृत्तीनंतर घरगुती कामे व शेती तसेच पूर्ण वेळ काम करण्याची संधी मिळणार आहे.
————————————————

फोटो -शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या निमित्त सत्कार सोहळा व शुभेच्छा स्वीकारताना क्षण( छाया- अजित जगताप, सातारा)

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button