आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-खुडे कुटुंबीयांची मायेची सावली- शोभा मम्मी

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

खुडे कुटुंबीयांची मायेची सावली- शोभा मम्मी

माणसाच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेल्या कर्तव्यातून त्यांची खरी ओळख निर्माण होते. आज संपूर्ण खुडे कुटुंबीयांचे आधारस्तंभ व मायेची सावली म्हणजेच श्रीमती शोभा सुरेश खुडे तथा मम्मी यांचा आज ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. या आनंदाच्या क्षणी अनेक नातेवाईक व कुटुंबतील सदस्य तसेच हितचिंतक उपस्थित आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने मायेची सावली असणाऱ्या मम्मीचा वाढदिवस साजरा होत आहे. या पाठीमागे कष्ट जिद्द व परिश्रम यांचा मिलाप आहे.

तस् पाहिलं तर मम्मीचे माहेरचे नाव – शोभा डेव्हिड पांढरे असे आहे . त्यांचे मूळ गाव – कसबे डिग्रज. जिल्हा सांगली असे असले तरी त्यांचा जन्म हा मुंबई सारख्या महानगरीत झाला आहे. आजची मुंबई दिसत आहे. ती त्यावेळी फारच लहान होती. अशा या मुंबई नगरीत दिनांक १ जून १९४९ रोजी श्रीमती शोभा तथा मम्मी यांचा जन्म झाला. मुंबई शहराच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या पोलीस दलात त्यांचे वडील कार्यरत होते. त्यामुळे घरामध्ये पोलीस शिस्त होती. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यावेळी सहजरित्या शासकीय नोकरी मिळत होती. पण त्यावेळी शिक्षणाचे महत्व कोणाला समजले नाही. त्यामुळे शेवटी चूल आणि मूल म्हणजे संसार अशी खुणगाठ बांधली जात होती. त्याकाळी लहानपणी लग्न होत असल्यामुळे दहावीपर्यंत शिक्षण घेत असतानाच सातारा येथील खुडे कुटुंबीयांची सून होण्याचे भाग्य मिळाले. त्यावेळी पप्पा म्हणजे सुरेश खुडे हे रयत शिक्षण संस्थेच्या सयाजीराव विद्यालयात शारीरिक शिक्षण शास्त्र पदवी संपादन करून शिक्षकाची नोकरी करत होते. आता जशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रात वेतन वाढले आहे .तशा पद्धतीने वेतन नव्हते. परंतु समाजामध्ये शिक्षकांना खूप मानसन्मान होता. सामाजिक जबाबदारी म्हणून या क्षेत्रात काम केलेल्या सुरेश खुडे यांनी अनेक विद्यार्थी घडवले. त्यावेळेला शोभा सुरेश खुडे या नावाने त्यांनी आपल्या सातारच्या दैदिप्यमान कारकिर्दीला शुभारंभ केला. संसार वेलीवर प्रकाश ,जॉन व डॅनियल अशी तीन मुले झाली .त्यांना लहानाचे मोठे करून त्यांना नोकरी व्यवसायात सहकार्य केले. थोरले चिरंजीव प्रकाश यांच्या विवाह करण्यात आला पण, नेहरू युवा केंद्रात कार्यरत असतानाच त्यांचे अकाली निधन झाले. आणि खुडे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशावेळी खचून न जाता त्यांनी सुना नातवंडांना मायेचा आधार दिला. आपल्या नातवंडांकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांची दोन मुलं म्हणजे जॉन हा बांधकाम व्यवसाय व डॅनियल हा पत्रकारी क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेली व्यक्तिमत्व ठरले आहे. आज नातवंडे सुद्धा विविध क्षेत्रांमध्ये शिक्षण घेऊन पुढे जाण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत.
डिग्रज येथील पांढरे कुटुंबीयांमध्ये सात भाऊ बहीण होते .वडील पोलीस होते. म्हणून घरात शिस्तीचं वातावरण असल्याने नियमित शिस्त अंगी रुजली आहे. सुरेश खुडे यांच्याशी ख्रिश्चन पद्धतीने दिनांक ८ नोव्हेंबर१९६७ रोजी विवाह झाला. आपल्या मुलीला सासरी पाठवताना त्यांच्या वडिलांनी स्वप्न बघितले होते. त्यांनी मुंबई मानवत नसल्याने डिग्रज येथे वास्तव्य केले. पंजाब नॅशनल बँक येथे त्यांनी पोलीस खात्यातील नोकरी सोडून रजू झाले. आज श्रीमती शोभा सुरेश खुडे यांचा एक भाऊ पोलीस व दुसरा भाऊ ख्रिश्चन मिशनरी मधील जनसंपर्क अधिकारी म्हणून यशस्वी कामकाज करत आहे.
आदरणीय व सर्वांची काळजी घेऊन पुन्हा आपल्या परतीचा प्रवास करणारे सुरेश दिनकरराव खुडे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला व ते साताऱ्यातील मल्हारपेठ येथे वास्तव्यास आले . सुरेश दिनकर खुडे हे सयाजीराव येथे शारीरिक शिक्षण शिक्षक होते. एन डी ए शिक्षण घेऊनच त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत काम काम करून समाजसेवा करण्याची सुरुवात केली. तेव्हा सर्व खुडे कुटुंबीय एकत्रित होते. त्यानंतर साताऱ्यातील करंजे पेठ येथे १९९० साली वास्तव्यास आले.२०१३ साली तामजाईनगर येथे वास्तव्यास आले.
सध्या त्यांना तीन मुले, तीन सुना, पाच नातवंडे व एक नात असा त्यांचा परिवार आहे आणि आज त्यांना ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज सुरेश पप्पा असते तर या आनंदाला चांगली झालो लागली असते परंतु नियती पुढे कुणालाही जाता येत नाही तरीही त्यांना उर्वरित आयुष्य सुखाचे समृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच सदिच्छा व्यक्त करतो………………….

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button