सातारा:-(आतीत)-बालिका पंचयात क्षमता बांधणी कार्यशाळा.
पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
बालिका पंचयात क्षमता बांधणी कार्यशाळा.
(Capacity Building Workshop for Adolescent Girls)
दिनांक :- २५ मे २०२४
ठिकाण :- आतित
सहभागी :- ७६
निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था निर्भया प्रकल्पच्या माध्यमातून बालिका पंचयात क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदरच्या कार्यशाळेत नागठाणे क्लस्टरमधील बालिका पंचयात गटातील मुली उपस्थित होत्या.
सदरची कार्यशाळा एकूण तीन सत्रामध्ये पार पडली. पहिल्या सत्रांमध्ये भरोसा सेल व अनैतिक मानवी तस्करी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. दुसऱ्या सत्रामध्ये जिल्हा रुग्णालय सातारा चे प्रतिनिधी उपस्थित होते व तिसऱ्या सत्रासाठी जिल्हा विधी सेवा प्रतिनिधि माननीय आशिष राठोड सर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. अतीत मधील बालिका पंचयात गटातील मुली स्वागत पर गीत गायले. विक्रांत मोरे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक व निर्माण संस्थेबद्दलची माहिती देऊन कार्यशाळेस सुरुवात करण्यात आली.
प्रथम सत्र
१)प्रथम सत्रांमध्ये बालकांचे हक्क व अधिकार व बालकांसाठी असणारा लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ याबद्दलची माहिती सांगितली.
२) भरोसा सेल अंतर्गत चालणारे विशेष बालपथक व त्याचे कामकाज, प्रतिकार कसा करायचा?,स्व सुरक्षा व कोणी त्रास देत असेल तर कोणाला सांगणार? याबद्दलची माहिती सांगितली.
३) संरक्षण म्हणजे काय संरक्षण कोणापासून मिळवायचे चांगला व वाईट स्पर्श कसा ओळखायचा बालकांसाठी असणारे हेल्पलाइन नंबर 1098 व 112 याबद्दलची माहिती सांगितली.
४) बालकाचे पालकांसोबत कशा प्रकारे नाते असावे, अनैतिक मानवी तस्करी काय असते व बालक कशा पद्धतीने अनैतिक मानवी तस्करीमध्ये अडकु शकते. वेश्याव्यवसाय व भीक मागण्या साठी भाग पाडले जाऊ शकते याबद्दलची माहिती सांगितली.
द्वितीय सत्र
१) वयात येणारी टप्पे म्हणजे बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था व वृद्ध अवस्था याबद्दल तसेच किशोरवयात होणारे शारीरिक मानसिक भावनिक बदल याबद्दलची माहिती सांगितली.
२) स्त्री प्रजनन संस्था, मासिक पाळी, त्यामध्ये घ्यायची काळजी, मासिक पाळी स्वच्छता दिन 28 मे, पौष्टिक आहार व लैंगिक संक्रमित रोग याबद्दलची माहिती सांगितली.
तृतीय सत्र
१) मोबाईलचा अतिवापर व त्याचे परिणाम, योग्य जोडीदार कसा निवडायचा, प्रेम व आकर्षण यातील फरक व आमिषाला बळी पडू नये त्या साठी गोष्टीच्या माध्यमातून मुलींना बालक लैंगिक गुन्ह्याचा बळी पडू नये यासाठी घ्यावयाची काळजी,बालकांसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा व बालक लैंगिक अपराधाचा बळी पडला असेल तर काय करावे याबद्दलची माहिती सांगितली
यांनी या तिन्ही सत्र पार पडत असताना मुलींना चेतना देण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेण्यात आल्या या गीत, खेळ ऍक्टिव्हिटीज सुचिता सातपुते मॅडम व काजल गायकवाड मॅडम यांनी घेऊन मुलींना प्रोत्साहन देण्याचे काम केले.
रमेश पुजारी यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन केले व दिवसभर झालेल्या कार्यशाळेचा आढावा किशोरवयीन मुलींचा गटा-गटात विभागणी करून घेण्यात आला. यामध्ये सहभागी मुलींनी उत्तम रित्या शिकलेल्या, समजलेल्या गोष्टी सर्वांसमोर मांडण्यात यशस्वी झाल्या.
सदरच्या कार्यशाळेसाठी निर्माण संस्थेमार्फत विक्रांत मोरे, रमेश पुजारी, सुचिता सातपुते ,सायली पडवळ, चांदणी चंदनशीवे ,विद्या गडकरी,कल्पना केंजळे व काजल गायकवाड उपस्थित होते.