श्रीरामपूर:-एवरेस्ट वीर कुमारी द्वारकाताई डोखे श्रीरामपूरात स्वागत समारंभ …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
एवरेस्ट वीर कुमारी द्वारकाताई डोखे श्रीरामपूरात स्वागत समारंभ …
श्रीरामपूर ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपूर – याबाबतची अधिक माहिती अशी की केसापूर ता राहुरी येथील कुमारी द्वारकाताई विश्वनाथ डोखे ( पोलीस निरीक्षक नाशिक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ) यांनी अधिक परिश्रमातून जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एवरेस्ट ( उंची 8849 मीटर ) हे दि 22 / 05 / 2024 रोजी सर केले आहे
अशी कामगिरी करणाऱ्या त्या देशातील पहिल्या पोलीस महिला अधिकारी ठरल्या आहेत त्यांच्या या कामगिरीमुळे फक्त केसापूर तसेच श्रीरामपूर शहराचं नाही तर जिल्हा आणि देशात आपल्या शिरपेचात मानाचा तुरा ओवला आहे
तरी द्धारकाताई यांचे उद्या सकाळी 7-40 वाजता श्रीरामपूर शहरामध्ये आगमन होणार आहे त्यांच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी उद्या सोमवार दिनांक 27 मे 2024 ला सकाळी 7 .40 वाजता श्रीरामपूर येथे या ऐतिहासिक क्षणास साक्षी होण्यासाठी उपस्थित राहावे आणि स्वागत समारंभात सहभागी व्हीवे हि नम्र विनंती केसापूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.