वाई:-वैष्णवी ढोकळे राजपत्रित संवर्गपदी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वैष्णवी ढोकळे राजपत्रित संवर्गपदी.

वाई दि १ :- ग्रामीण भागातील कुमारी वैष्णवी सुजाता विजय ढोकळे यशाची बिरुदमाला — पहिल्याच प्रयत्नात ‘क्लास वन अधिकारी’ पदावर निवड….परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर कुमारी वैष्णवी विजय ढोकळे यांनी महाराष्ट्र राज्य सेवा स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाची सुवर्णकीर्ती मिळवत सहाय्यक राज्यकर आयुक्त वर्ग -१ या पदी निवड झाली आहे. त्यांच्या या अभिमानास्पद यशामुळे ओझर्डे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण ओझर्डे ता.वाई येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळेत झाले असून दहावीपर्यंतचे शिक्षण पतितपावन विद्यामंदिर,ओझर्डे येथे पूर्ण केले.प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतही ती जिल्हा गुणवत्ता यादीत झळकली होती.पुढील इयत्ता ११ वी व १२ वीचे शिक्षण कलासागर अकॅडमी वाई येथे घेतले तर उच्च शिक्षणातील पदवी तिने सांगली येथील नामांकित वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.टेक (कंप्युटर सायन्स) मध्ये पदवी प्राप्त केली.
घरची आर्थिक परिस्थिती सामान्य असतानाही वडील एस.टी. डेपो वाई येथे मेकॅनिक म्हणून काम करत असल्याची जाणीव ठेवून, त्यांचे परिश्रम व त्याग प्रेरणादायी मानत वैष्णवीने अभ्यासात कसूर न करता कठोर परिश्रमाची पराकाष्ठा केली.आई वडील आजी आजोबा कुटुंबीयांची साथ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर तिने हे स्वप्न सत्यात उतरवले.तीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ओझर्डे गावातील ग्रामस्थ, मित्र परिवार, एस.टी.सेवेतील मित्र परिवार, साळीसमाजबांधव, नातेवाईक व कलाविष्कार क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य आणि मित्रपरिवाराने अभिनंदनाचा वर्षाव केला असून, भविष्यातही त्या प्रशासनात उज्ज्वल कार्य करत समाजसेवेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




