ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड येथील पंतप्रधान मोदींच्या यशस्वी सभेने वातावरण महायुतीमय …..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

कराड येथील पंतप्रधान मोदींच्या यशस्वी सभेने वातावरण महायुतीमय …..

कराड दि: भारतीय जनता पक्षाने पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विदर्भ मधील पाच लोकसभा मतदार संघात शांततेने मतदान झालेले आहे. आता पुढील टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवाराच्या विजयासाठी मोर्चा बांधणी केली जात आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील भाजपचे उमेदवार श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य व मोजके मार्गदर्शन केल्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील वातावरण महायुतीमय झाले आहे.
श्री छ खा उदयनराजे भोसले यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या या सभेने खऱ्या अर्थाने देशाचे नेतृत्व भाजपच्या हाती असल्याचे अधोरेखित झाले आहे.
कराड या ठिकाणी जाहीर सभेला रिपब्लिकन राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, डॉ. मच्छिंद्र सकटे , रिपब्लिकन नेते जयदीप कवाडे,श्री छ उदयनराजे भोसले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, पालकमंत्री शंभूराजे देसाई, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आ महेश शिंदे , माजी आमदार मदन भोसले, डॉ. अतुल भोसले ,विक्रम पावसकर, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील एकनाथ बागडी, व महायुतीचे घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या जाहीर सभेने करारातील सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत त्यामुळे कमळ चिन्ह आता गुलालासाठी आगे कूच करत असल्याचेच दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३५ मिनिटांच्या भाषणामध्ये संविधान व आरक्षण ,काँग्रेस व अन्य विरोधकांवर आरोप, एनडीए सरकारची कामगिरी, साताऱ्याची परंपरा व श्री छ उदयनराजे भोसले यांना विजयी करण्याचे तसेच उपस्थित लोकांना आपल्या घरी जाऊन सर्वांना नमस्कार सांगा. अशी व्यक्तिगत विनंती त्यांनी करून अनेकांची मन जिंकले आहेत. सातारकरांचे दर्शन व्हावे म्हणूनच आलेला असून या निवडणुकीतील विजय हा दिशादर्शक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्यातील महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष अशा विविध संघटना व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत प्रचारात परिश्रम घेत आहेत.
आतापर्यंत कराड, सातारा, पाटण, जावळी, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, खटाव या परिसरात भाजपचे उमेदवार श्री. छ. खा. भोसले यांचे संपर्क दौरे झाले आहेत. भाजप सातारा -जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पाटण पालकमंत्री शंभूराजे देसाई , कोरेगावचे शिवसेना आ. महेश शिंदे, वाई- खंडाळा- महाबळेश्वर आमदार मकरंद पाटील हे आणि त्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी झालेले आहेत. भाजप प्रदेश निवडणूक प्रभारी निर्भर सुराणा यांच्याशी संवाद साधून प्रचार यंत्रणा गतिमान करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी है तो मुमकिन है… सातारा जिल्हा भाजप का नमकीन है.. अशा घोषणा देण्यात येत आहे. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकाचा जिल्हा या ठिकाणी आता विचाराची लढाई लढली जाणार आहे. या सभेला किमान लाखभर कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते . ही सभा यशस्वी करून श्री छ खा उदयनराजे भोसले यांच्या कमळ या चिन्हाचे मताधिक्य वाढवण्यासाठी आता महायुतीतील घटक पक्षांमध्ये चढा ओढ लागलेली ग्रामीण भागात चित्र पहाण्यास मिळत आहे.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button