सांताक्रुझ:-(वाकोला)- वाकोला येथील शेखर आणि ममता भगत यांचा पंचविसावा लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न.
पत्रकार मंजुळा पिसाळ महाराष्ट्र राज्य महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार मंजुळा पिसाळ महाराष्ट्र राज्य महिला कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS
वाकोला येथील शेखर आणि ममता भगत यांचा पंचविसावा लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न.
मुंबई 🙁 सांताक्रुझ)- वाकोला येथील रहिवाशी शेखर तुकाराम भगत यांनी लहानपणापासूनच खूप कष्ट केले. मिळेल ती नोकरी केली नंतर रिक्षा चालवली कामाची कधीच कसलीच लाज बाळगली नाही. त्यांच्या वडीलांची शिकवण होती काम करायचं पण ते प्रामाणिकपणे त्यानंतर त्यांना मिठीबाई कॉलेजमध्ये नोकरी मिळाली त्यानंतर काही वर्षातच लग्न झालं त्यांना दोन मुलं झाली कुणाल आणि अदीप सगळं ठीक होतं.. नोकरीमध्ये असताना युनियनचे लीडर म्हणून काम केल श्री वृंदावन सोसायटीमध्ये मुख्य पदावर काम केले एन एम आय एस मधील क्रेडिट सोसायटीमध्ये व्हाईस चेअरमन म्हणून काम केलं एन एम आय एस च्या उत्सव कमिटी मध्ये अध्यक्ष म्हणून काम केलं ..समाजामध्ये धार्मिक क्षेत्रात कुठल्याही पदाची अपेक्षा न करता धार्मिक काम करत असतात अशा पद्धतीने ते त्यांच आयुष्य जगतात पत्नी नोकरीला असल्यामुळे त्या मुलांची खूप छान जवाबदारी सांभाळतात त्याना खूप चांगले संस्कार देतात. आणि पत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळे पत्नी धार्मिक क्षेत्रामध्ये काम करू शकली, शिक्षण पूर्ण करू शकली
आदरणीय बौद्धाचार्य ममता शेखर भगत यांचे बालपण खूप सुखात गेले.कारण आई दोन मोठ्या बहिणी यांच्यासोबत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. मोठ्या कुटुंबामध्ये खूप सुखी आणि समाधानी होत्या. शिक्षण बारावीपर्यंत झालं नंतर लग्न झाले.लग्न झाल्यानंतर कधीच आई-वडील भाऊ बहीण यांची कमी नाही जाणवली आणि इतकं प्रेमळ सासर मिळालं त्यातच नोकरीमुळे गावाला जावं लागलं.तरीही मुलांची जबाबदारी सांभाळल्यामुळे नोकरी करू शकले हे माझं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण केले.त्यानंतर धार्मिक क्षेत्रांमध्ये जे जे आवडतं ते करू शकते ते केलं स्वतः बावध आचार्य झाल्या.त्यांना अनेक ठिकाणी प्रवचन देऊन स्वतःच असं स्थान निर्माण केलं. त्यानंतर पुन्हा शिक्षण अर्धवट न ठेवण्यासाठी बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत जाण्यासाठी आपल्यालाला संविधानाचा अभ्यास करायला हवा त्याच्यासाठी मग कायद्याचा अभ्यास करण्याचे ठरवले आणि आता सध्या त्या law करत आहेत. दोघा पती-पत्नी मधील बॉण्डिंग अतिशय सुंदर आहे हे सगळ्यांना पहावयास मिळाले.