पुसेसावळी:-(खटाव)-चोराडेत भैरवनाथ यात्रेस उद्यापासून प्रारंभ.
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS
चोराडेत भैरवनाथ यात्रेस उद्यापासून प्रारंभ.
गुरुवार मुख्य दिवस कुस्ती मैदानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन पुसेसावळी दि.30 सातारा सांगली जिल्ह्यासह परराज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चोराडे तालुका खटाव येथील जागृत देवस्थान श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त बुधवारपासून ता. 1 मे ते 4 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे विटा महाबळेश्वर राज्य महामार्गावर असणारे चोराडे येथील श्री भैरवनाथ मंदिर हे पौराणिक ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे मंदिर आहे नवसाला पावणारा भैरवनाथ म्हणून हे देवस्थान प्रसिद्ध आहे सालाबाद प्रमाणे यावर्षीही श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त बुधवारपासून पहाटे चार वाजता भैरवनाथाचा अभिषेक व महापूजा करण्यात येणार आहे रात्री 7 ते पहाटे 4 वाजेपर्यंत लेझीम गजी मंडळ , फटाक्यांच्या आतशबाजीसह हलगी, सनई,पारंपारिक वाद्यांच्या गजरात भैरवनाथाची पालखीतून भव्य मिरवणूक छबिना काढण्यात येणार आहे गुरुवार दिनांक 2 यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी 7 ते 1वाजेपर्यंत हजारो भाविकांच्या उपस्थितीत भैरवनाथाच्या मानाच्या सासनकाठीसह गुलाल खोबऱ्याची उधळण करीत पालखी मिरवणूक निघणार आहे यावेळी भाविकांच्या वतीने एक रुपयापासून हजारो रुपयांच्या माळा पालखीवर अर्पण केल्या जातात दुपारी 1ते 5 मायाक्का ओविकार मंडळ चोराडे यांचा कार्यक्रम होईल रात्री 8 वाजता आर्केस्ट्रा धमाल म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे दिनांक 3 रोजी सकाळी व रात्री 7 वाजता सोनाली गजरा कराडकर लोकनाट्य तमाशा होईल दुपारी चार वाजता कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 4 रोजी सायंकाळी सहा वाजता श्री संतोषी माता भव्य मिरवणूक व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे परिसरातील भाविक भक्तांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमेटी अध्यक्ष बुवासो पिसाळ सचिव कृष्णत पिसाळ, चोराडे ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.