कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-मोतीबाग उजेडात; प्रभाग क्र. ६ मध्ये २० लाखांच्या कामाचा धडाकेबाज शुभारंभ! 

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 मोतीबाग उजेडात; प्रभाग क्र. ६ मध्ये २० लाखांच्या कामाचा धडाकेबाज शुभारंभ!

वाई | दि. ३० डिसेंबर २०२५
वाई नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ६ मधील मोतीबाग परिसरात अखेर विकासाचा उजेड पडला आहे. लाईटचे पोल उभारणे, इलेक्ट्रिक लाईन ओढणे व स्ट्रीट लाईट बसवणे या महत्त्वपूर्ण कामाचा आज जोरदार शुभारंभ झाला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नागरिकांची मागणी आज प्रत्यक्षात उतरली आहे.
या प्रसंगी वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, प्रभाग ६ चे नगरसेवक विजय दादा ढेकाणे, डॉ. जागृती पोरे, नगरसेवक प्रसाद बनकर, सौ. अपर्णा ताई जमदाडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून सुमारे २० लाख रुपयांच्या निधीतून हे काम होत असून जवळपास ५० लोखंडी खांब व त्यावर स्ट्रीट लाईट बसवले जाणार आहेत. या कामामुळे MIDC कडे जाणारा रस्ता, कॅनॉलपर्यंतचा भाग, पेटकर वस्ती तसेच रमेश शिंदे यांच्या घरापासून ननावरे वस्तीपर्यंतचा संपूर्ण परिसर उजेडात येणार आहे.
मोतीबाग परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत, “वर्षानुवर्षांचा अंधार दूर झाला,” अशी भावना व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक विजय ढेकाणे यांनी कामाबाबत माहिती देत उपस्थितांचे आभार मानले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button