आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-सौ.रंजना मोहन भिसे(दा ल व डी) यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

सौ.रंजना मोहन भिसे(दा ल व डी) यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर.

फलटण प्रतिनिधी :
ज्ञानविकास मंडळ सातारा यांच्यातर्फे दरवर्षी देण्यात येणारा आदर्श माता पुरस्कार यावर्षी एव्हीबी माझाचे चे संपादक विजय भिसे यांच्या मातोश्री सौ. रंजना मोहन भिसे यांना जाहीर झाला आहे. सौ. रंजना भिसे यांनी आपल्या मुलांबरोबर, दिरांची मुले यांनाही शिक्षण देऊन एक पिढी सशक्त केली आहे त्यांनी आपल्या आई वडिलांची परिस्थिती हलाखीची असताना लहान भावांना शिक्षणासाठी आधार दिला व त्यांना घडवले. एक पिढी सशक्त घडण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांची प्रेरणा घेऊन शेजारच्या कुटुंबामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे. स्वतः अपार कष्ट करून मेहनतीने त्यांनी संसार करून मुले घडवली व समाजाला दिशादर्शक काम केले आहे. त्यामुळे त्यांची आदर्श माता म्हणुन निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
दरवर्षी सातारा येथील ज्ञान विकास मंडळ खडतर परिस्थितीत जीवन जगून आपल्या मुलांना शिक्षण देउन घडवते त्यांच्यावर चांगले संस्कार करते अशा आदर्श मातांना पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. त्यांचे हे 35 वे वर्षे आहे. आजपर्यंत ज्ञानविकास मंडळाने सुमारे 160 मातांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरवले आहे. यावर्षीचा आदर्श माता गौरव पुरस्कार कार्यक्रम दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी महिला मंडळ सभागृह गांधी मैदान राजवाडा येथे संध्याकाळी साडेपाच वाजता संपन्न होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ज्ञान विकास मंडळ सातारा यांनी चार आदर्श मातांचा सत्कार आयोजित केला आहे या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती ज्ञानविकास मंडळाचे अध्यक्ष यांनी केली आहे.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button