क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-वडूजमध्ये चाकूहल्ल्यात युवक गंभीर जखमी.

पत्रकार शरीफ पटेल सातारा जिल्हा इन्वेस्टीगेशन रिपोर्टर 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार शरीफ पटेल सातारा जिल्हा इन्वेस्टीगेशन रिपोर्टर

RPS STAR NEWS

वडूजमध्ये चाकूहल्ल्यात युवक गंभीर जखमी.

वडूज, दि. ६ (प्रतिनिधी) जाधवला – तू माझे देवाचे चांगले का बघितले नाहीस ? तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणून रिक्षाचालक हिम्मत विठ्ठल पाटोळे (वय ३२ रा. वडूज) याने अक्षय प्रकाश जाधव (वय २७) याच्या पोटावर, हातावर आणि छातीवर चाकूने वार केले. ही घटना वडूज येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयासमोर शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. यात गंभीर जखमी झालेल्या अक्षय जाधव याच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, हिम्मत पाटोळे याने अक्षय जाधवला वडूज एसटी बसस्थानक परिसरात शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास शिवीगाळ केली.तू माझे वाटोळे केले आहेस. तुला आता जग बघून देत नाही, असे म्हणत हिम्मतने अक्षयच्या पोटावर, हातावर आणि छातीवर चाकूने सात ते आठ वार केले. यात जखमी झालेल्या अक्षयला वडूज ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने, त्याला पुढील उपचारांसाठी सातारा येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. याबाबत अक्षयचा भाऊ अमोल जाधव (रा. कातरखटाव, ता. खटाव) यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी हिम्मत पाटोळे याला अटक केली आहे. त्याच्यावर भादंवि कलम ३०७ व ५०४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद वाघ तपास करत आहेत.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button