खटाव:-म्हासुर्णे येथे विविध विकास कामांचे आज उदघाटन..
पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
म्हासुर्णे येथे विविध विकास कामांचे आज उदघाटन..
पुसेसावळी : खटाव माणचे आमदार.जयकुमार गोरे व भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशिलदादा कदम यांच्या प्रयत्नातून खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ बुधवार दि.१८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता पुसेसावळी जि.प गटाचे युवानेते विक्रमशिल कदम यांच्या शुभहस्ते होणार आहे,
तरी या कार्यक्रमास वडूज बाजार समितीचे संचालक महेश घार्गे, श्रीकांत पिसाळ,बापूशेठ पिसाळ, धनाजी पाटील,बाळू थोरात,महेश पाटील,धोंडीराम पोपळकर,संजय पवार,जयदीप देशमुख,प्रताप शिंदे आदीची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी म्हासुर्णे गावामध्ये श्री.हेमंत कुलकर्णी यांचे घरापासून ते श्री. पोपट माने यांचे घरापर्यंत अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे ४ लाख रुपये,तसेच श्री. सुरेश माने (कैकाडी समाज) यांचे घरापासून ते पंढरीनाथ महाराज यांचे घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे ५ लाख रुपये,
या विकासकामांचे उद्घाटन होणार आहे.तरी या कार्यक्रमास सर्व ग्रामस्थ व महिला वर्गानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन म्हासुर्णे गावचे युवा नेते पै.तुषार माने व महेश पवार यांनी केले आहे.