रायगड:-(पेन)-भारतीय महिला फेडरेशन (रायगड जिल्हा) यांच्या वतीने शहीद भगतसिंग दिन साजरा.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
भारतीय महिला फेडरेशन (रायगड जिल्हा) च्या वतीने
शहीद भगतसिंग दिन साजरा.
दिनांक २३ मार्च २०२४ रोजी भारतीय महिला फेडरेशन रायगड जिल्हा कमिटीच्या वतीने शहीद भगतसिंग यांचा शहीद दिन महात्मा गांधी वाचनालय पेण येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड जयवंत पाटील सचिव रायगड जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पार्टी हे होते. प्रमुख पाहुणे भाई जयंत पाटील सरचिटणीस शेतकरी कामगार पक्ष, कॉम्रेड लता भिसे सोनवणे सचिव महिला फेडरेशन महाराष्ट्र,कॉम्रेड सौ.भारती भोयर अध्यक्ष महिला आघाडी व वीज कामगार नेत्या,कॉम्रेड एडवोकेट लोहेकर,कॉम्रेड सुहास मोकाशी ग्रामपंचायत कर्मचारी नेते, शेतकरी कामगार पक्षाचे अनेक नेते व सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन भारतीय महिला फेडरेशन रायगड जिल्हा पेणच्या कॉम्रेड सौ.मोहिनी गोरे व सौ. भारती शेळके यांनी केले होते. कार्यक्रमास भारतीय महिला फेडरेशन व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.