खटाव:-गुदगे यांनी त्यांचा सवता सुभा जिल्हा परिषदेत निवडून येवून दाखवावा-जयवंत खराडे
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख:-9890318605
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख
गुदगे यांनी त्यांचा सवता सुभा जिल्हा परिषदेत निवडून येवून दाखवावा-जयवंत खराडे
जे निवडून आलेत ते माझ्यामुळे हा अहंकार व दर्प ज्या पक्षात आपण आहोत व ज्या पक्षाने आपणास जिल्हा परिषदेत पाठवले आहे त्या राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध दाखवणे कृतघ्नपणाचे आहे असे मत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्री. जयवंत खराडे यांनी व्यक्त केले आहे.
ही फक्त पक्षाशी गद्दारी नसून ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादीशी युती करून रात्रंदिवस परिश्रम घेतले त्यांच्याशी सुद्दा ही गद्दारीच आहे. पक्षाच्या पराभवाची जे जबाबदारी घेतात तेच खरे पक्षाचे नेते असतात. त्यांच्याच मागे जनता उभी राहते. तालुका अध्यक्ष श्री. नंदकुमार मोरे यांनी हे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीला ४७ टक्के मते आहेत हेही दाखवून दिले आहे. तुम्हाला वेगळा सवता सुभा करायचा असेल तर तो तुम्ही राष्ट्रवादीचा आधार न घेता जिल्हा परिषदेत निवडून येवून दाखवावा असेही श्री. खराडे यांनी म्हटले आहे.