सातारा शहरातील अतिक्रमणाबाबत निवडणुकीच्या तोंडावर रोहन राजेशिर्के यांच्या आंदोलनाची चर्चा….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा शहरातील अतिक्रमणाबाबत निवडणुकीच्या तोंडावर रोहन राजेशिर्के यांच्या आंदोलनाची चर्चा….
सातारा दि: सातारा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बोकाळले आहे . एकेकाळी पेन्शनरचे शहर असणाऱ्या साताऱ्यात सध्या अतिक्रमण न करेल तो आळशी अशी परिस्थिती झालेली आहे. सातारा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक कार्यकर्ते रोहन तथा दादासाहेब राजेशिर्के यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यामुळे आता सातारा शहरातील अतिक्रमणाबाबत खमंग चर्चा सुरू झालेली आहे.
याबाबत माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते रोहन तथा दादासाहेब राजेशिर्के यांनी सातारा शहरातील आदालत वाड्यासमोरील ऐतिहासिक हौद असलेल्या इमारतीच्या शेजारी बांधकाम पूर्ण करताना त्याला कोणत्याही अडथळा होऊ नये. यासाठी हौद बुजवण्यात आला. वास्तविक पाहता राजे राजवाड्यांनी त्या काळी प्रजेसाठी हौद बांधला होता. पण, त्यांच्या पूर्वजांकडे आता सातारा नगरपालिका सत्ता असूनही याकडे कोणाचं लक्ष नाही. येथील बांधकाम अतिक्रमण करून करण्यात आलेले आहे. भाग निरीक्षकांनी हौद मुजवला असल्याचे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. पण त्याची खबर सातारा नगरपालिकेला प्रशासनाला नसल्याचेच दिसून आलेले आहे. या ठिकाणी अतिक्रमणाला अभिजीत दर्जा मिळावा. यासाठी मोठ्या प्रमाणात काही मध्यस्थी मंडळी हालचाल करत आहेत. असा गंभीर आरोप आंदोलन करते रोहन राजेशिर्के यांनी केला आहे.
ठेकेदारांचे हित पाहणाऱ्या सातारा नगरपालिकेबाबत डझनभर तक्रारी आहे. पण त्या तक्रारीचे पुढे काही होत नाही. नैसर्गिक ओढा बुजवून अतिक्रमण झाले असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचुन अनेक दुकानदाराचे नुकसान होणार आहे. एवढेच नव्हे तर तेथे रस्ता सहा मीटरचा असताना वास्तव्यात पण नऊ मीटरचा रस्ता दाखवण्यासाठी नैसर्गिक ओढा मोजून नऊ मीटरचा रस्ता दाखवून तेथील सेवन हिल्स बांधकामाला परवानगी घेण्यात आलेली आहे . रस्त्याचे रुंदी कमी करण्यात आलेली आहे सदरच्या अतिक्रमण दूर करावं यासाठी रोहन राजे शिर्के यांनी आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला समाजातील विविध स्तरातील लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. आज या आंदोलनाबाबत जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली नाही. खाल्लेल्या मिठाला जागणारे सातारा नगरपालिका व जिल्हा प्रशासन म्हणजे खऱ्या अर्थाने ठेकेदारांचे मसिहा आहेत. मी मारल्यागत करतो तू रडल्यागत कर.. असा पाठ शिवणीचा खेळ या ठिकाणी होत असल्याने आंदोलकांची गळचेपी सुरू आहे. आज या आंदोलन स्थळी सातारा लोकसभेचे आरपीआयचे उमेदवार संजय गाडे, ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर, अजित जगताप, महेश शिवदास, आदित्य गायकवाड, अशोक बरकडे , उमेश लांडगे ,महेश भिसे, महेश पाटील, संजय माने, सागर माने, प्रमोद मोरे, सचिन भोसले, सविता शिंदे आदी मान्यवरांनी भेट घेऊन पाठिंबा दिला आहे. दरम्यान या आंदोलनाची सांगता चांगली व्हावी अतिक्रमण दूर व्हावे. अन्यथा सातारा लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवाराचा झेंडा मिरवून जर कोणी यामध्ये सहभागी होत असेल तर ते सातारकरांचे दुर्दैव ठरणार आहे.
————————————————–
फोटो -सातारा जिल्हा अधिकारी कार्यालय उपोषणा बसलेले रोहन राजेश शिर्के व त्यांना पाठिंबा देणारे कार्यकर्ते (छाया- अजित जगताप, सातारा)