वैजापूर:-पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रा.लि.महालगाव येथे द्वितीय गाळप हंगाम २०२५-२६ उत्साहात सुरु..!
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रा.लि.महालगाव येथे द्वितीय गाळप हंगाम २०२५-२६ उत्साहात सुरु..!

वैजापूर (प्रतिनिधी): पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रा. लि., महालगाव येथे द्वितीय गाळप हंगाम २०२५-२६ चा भव्य शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी गुरुवर्य महंत पूजनीय रामगिरीजी महाराज (मठाधिपती, श्री क्षेत्र सराला बेट) यांच्या पवित्र उपस्थितीत पूजन विधी संपन्न झाला.
या प्रसंगी पंचगंगा उद्योग समूहाचे चेअरमन श्री. प्रभाकरजी शिंदे साहेब यांनी हंगाम २०२५-२६ साठी ऊसदर जाहीर करताना सांगितले की,
“पंचगंगा कारखाना हा मराठवाड्यातील साखर कारखान्यांपैकी सर्वात प्रथम उच्चांकी ऊसदर जाहीर करणारा कारखाना ठरला आहे. शेतकऱ्यांना योग्य दर देने हीच आमची परंपरा आहे.”
ऊस जाती ८६०३२, ३१०२, १५०१२, ८००५, १८१२१, १०००१ साठी – १३१५०/- प्रति मेट्रिक टन
ऊस जाती २६५ व इतरांसाठी – १३०५०/- प्रति मेट्रिक टन
शिंदे साहेब पुढे म्हणाले,
“शेतकऱ्यांनी कोणत्याही वजनकाटयावर ऊस वजन करून आणावा. जर कोणी इतर साखर कारखान्यास ऊस पाठवत असेल, तरी त्यांनी आमच्या काट्यावर ऊस वजन करून घ्यावे. आमचा उद्देश शेतकऱ्यांना पारदर्शक व योग्य दर मिळवून देने आहे.”
पंचगंगा उद्योग समूहाने शेतकरी केंद्रित धोरण कायम ठेवत या हंगामात १० लाख मेट्रिक टनांहून अधिक ऊस गाळपाचे लक्ष्य ठेवले आहे.
शेतकरी हिताला प्राधान्य देत पंचगंगा उद्योग समूह लवकरच मक्याची खरेदी सुरू करणार आहे. या संदर्भात श्री.प्रभाकरजी शिंदे साहेब म्हणाले,
“मक्याची खरेदी लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. सध्या तालुक्यात व इतर ठिकाणी आद्रतेच्या प्रमाणानुसार मका १११०० ते ११३०० प्रति क्विंटल दरान े खरेदी केला जात आहे परंतु याला पर्याय म्हणून पंचगंगा उद्योग समूहाने पुढाकार घेत किमान दर ११५००/- प्रति क्विंटल निश्चित केला आहे. तसेच देशातील दररोजच्या बाजारभावानुसार दर देण्यात येईल.”
या निर्णयामुळे स्थानिक शेतकऱ्यांना योग्य व स्थिर बाजारभाव मिळून आर्थिक बळकटी मिळेल, असा विश्वास शिंदे साहेबांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे ऊसाबरोबरच इतर पिकांनाही बाजारभाव स्थैर्य मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण होईल, असा विश्वास शिंदे साहेबांनी व्यक्त केला.
“शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि कारखान्याला सातत्यपूर्ण विकास हेच आमचे ध्येय आहे. पंचक्रोशीतील सर्व ऊस उत्पादकांनी आपला ऊस पंचगंगा कारखान्याकडेच पाठवावा.”असे आवाहन श्री. प्रभाकरजी शिंदे साहेब यांनी केले.
या गाळप हंगामामुळे स्थानिक रोजगाराच्या संधीमध्य े वाढ होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.या वेळी सर्व उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसदर व मका दर जाहीर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पंचगंगा उद्योग समूहाने कायम ठेवलेले शेतकरी- केंद्रित धोरण आणि पारदर्शक व्यवहारामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाच े वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाला पंचगंगा उद्योग समूहाच े मार्गदर्शक श्री. उत्तमराव शिंदे (अण्णा), वैजापूर- गंगापूर मतदारसंघाच े कार्यसम्राट आ. मा. रमेशजी बोरनारे सर, नेवासा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आ. श्री. विठ्ठलराव लंघे साहेब, मा. कुंडलिकराव माने पाटील (माजी चेअरमन, गंगापुर साखर कारखाना), सी.ए. मा. भाऊराव गायकवाड साहेब, शिवाजीराव बनकर (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस किसान मोर्चा), बाबासाहेब पाटील जगताप (जिल्हा प्रमुख, शिवसेना), अविनाश पाटील गलांडे (माजी सभापती, जिल्हा परिषद), बाळू शेठ संचेती (उद्योजक), विजुभाऊ पवार (तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), डॉ. प्रकाश शेळके (तालुका प्रमुख, शिवसेना), आबासाहेब काळे (सरपंच, महालगाव), विधीतज्ञ अॅड. Y. S. थोरात. तसेच संचालक मंडळातील मा. श्री. बाळासाहेब उत्तमराव शिंदे, मा. श्री.बाबासाहेब उत्तमराव शिंदे, मा. श्री. विवेक बाळासाहेब शिंदे (कार्यकारी संचालक), मा कॅप्टन प्रशांत माने, मा. सचिन माने, मा. श्री. प्रबोध प्रभाकर शिंदे, श्री. सुधीर माने, श्री. अमोल माने, श्री. मच्छिंद्र पठाडे आणि मा. श्री. तेजस बाबासाहेब शिंदे उपस्थित होते.
तसेच कारखान्याचे विविध अधिकारी कर्मचारी, परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी व वाहतूक ठेकेदार, प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येनने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. सुधीरभाऊ माने यांनी सर्व उपस्थित मान्यवर, शेतकरी बांधव, पत्रकार आणि कर्मचारीवर्ग यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी गाळप हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.




