मुंबई मराठी अस्मितेला आव्हान?”मुंबईच्या महापौरपदावरून कृपाशंकर सिंहांचे खळबळजनक विधान.
पत्रकार प्रमोद काळे हवेली तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मुंबई मराठी अस्मितेला आव्हान?”मुंबईच्या महापौरपदावरून कृपाशंकर सिंहांचे खळबळजनक विधान.

मुंबई :
मुंबईच्या महापौरपदावरून माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. “मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार” असे वक्तव्य करताच राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, या विधानाला मराठी अस्मितेवर थेट आव्हान मानले जात आहे.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून, महापौरपद हे केवळ प्रशासकीय नव्हे तर भावनिकदृष्ट्याही अत्यंत संवेदनशील मानले जाते. अशा पार्श्वभूमीवर कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याने मराठी विरुद्ध अमराठी असा सुप्त वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विरोधी पक्षांसह अनेक मराठी संघटनांनी या विधानाचा तीव्र निषेध केला असून, “मुंबई कोणाच्या बापाची नाही, ही मराठी माणसाची आहे,” अशा शब्दांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तर काही राजकीय नेत्यांनी या वक्तव्यामागे निवडणुकीपूर्व ध्रुवीकरणाचा डाव असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, सत्ताधारी पक्षांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी या विधानाचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकीत उमटण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
मुंबईच्या राजकारणात हे वक्तव्य नेमका कोणता वळण देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




