खटाव – (पुसेसावळी):-वडगाव येथील नागमल कुटुंबीयांचा ऊस शॉर्ट सर्किट मुळे जळून खाक.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
वडगाव येथील नागमल कुटुंबीयांचा ऊस शॉर्ट सर्किट मुळे जळून खाक.
मायणी प्रतिनिधी___खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथील वाण्याचा मळा येथील शिवारात शेतात वरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वायरचे शॉर्टसर्किट झाल्याने सात एकर ऊस व ठिबक सिंचन पाईप असे एकूण सात लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती येथील शेतकरी दिलीप नागमल, व नंदू नागमल यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सात रोजी बुधवारी सकाळी अचानक दिलीप नागमल, चंदू नागमल, तसेच निलेश नागमल, यांच्या शेतातून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वायरच्या ठिनग्या उसाच्या शेतात पडल्याने अचानक ऊसाला आग लागली ही बातमी त्यांच्या कुटुंबाला कळतात त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचवेळी वारा सुटल्याने आग भडकतच गेली आणि संपूर्ण ऊस जळून खाक झाला याचवेळी आग विझवताना सौ सुमन दिलीप नागमल यांच्या हाताला ,पायाला देखील भाजले आहे याबाबत स्वतः दिलीप नागमल यांनी पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेची माहिती दिली असून पोलीस हवालदार आर ,बी, कुंभार अधिक तपास करीत आहेत