आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव :-(वडूज)- पंचायत समिती वडूज खटाव यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप.

पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

पंचायत समिती वडूज खटाव यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप.

दि 9 मार्च रोजी पंचायत समिती वडूज येथे खटाव तालुक्यातील ४२८ दिव्यांग व्यक्तींना, माताभगिनिंना आवश्यक वस्तूंचे वितरण माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.श्री.रणजितसिंह नाईक निंबाळकर,माण-खटावचे आमदार मा.श्री.जयकुमार गोरे (भाऊ), सौ.प्रियाताई महेश शिंदे,गटविकास अधिकारी मा.सर्जेराव पाटील साहेब, माढा भाजपा लोकसभा संयोजक जयकुमारजी शिंदे,वडूज नगरीच्या नगरअध्यक्षा सौ.मनिषा रविंद्र काळे व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग भारत सरकार सामाजिक अधिकारिता शिबीर अंतर्गत दिव्यांगांसाठी भारत सरकारच्या एडिप योजने अंतर्गत मोफत सहाय्यक उपकरण वितरण करण्यात आले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सौ.गायकवाड मॅडम,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री. बोईनवाड, प्रकल्प अधिकारी ओमासे मॅडम, सहाय्यक गटविकास अधिकारी गोसावी साहेब, बाल विकास अधिकारी एस एस खाबडे, ग्राम विस्तार अधिकारी माने साहेब, भाजपा माण विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले,महिला मोर्चा खटाव तालुकाअध्यक्ष सौ.वृषाली रोमन ,वडूजचे सर्व आजी माजी नगरसेवक, व नगरसेविका,अपंग विकास महासंघ राज्य संचालक अमिन आगा, नामदेव ईंगळे व आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर माने सर यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वि करण्यासाठी पंचायत समिती कर्मचारी वृंदाने अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button