आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती व जागतिक महिला दिन संपन्न.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती व जागतिक महिला दिन संपन्न.

आज आमच्या आश्रमशाळेत निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा जयंती व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गाडगे महाराज मिशन मुंबई चेअरमन मा.श्री. मधुसूदन मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आश्रमशाळेत कार्यरत असणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादा व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते यांचे शुभहस्ते भेटवस्तू प्रदान करून सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषणे केली.

माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी सांगितली. आज महिला आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत असे सांगितले. त्याचबरोबर निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री मधुसूदन मोहिते पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डेबू ते संत गाडगेबाबा हा आदर्श जीवनप्रवास सांगून बाबांचा संदेश अंगिकारून सर्वांनी कार्यरत राहणे आवश्यक आहे असे सांगितले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत हेरंब कुलकर्णी व इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहलेल्या लेखाचे वाचन केले.

माध्यमिक आश्रमशाळेच्या अधीक्षक श्रीमती स्वाती बोभाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.दीपक माने यांनी केले.

याप्रसंगी सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.महेशकुमार बोभाटे व आभार श्री.रमेश घोलप यांनी मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button