आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहाता:- नांदुर्खी बु.ग्रामपंचायत शेजारील अंगणवाडीची अत्यंत खराब दुरावस्था..ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

राहाता:- नांदुर्खी बु.ग्रामपंचायत शेजारील अंगणवाडीची अत्यंत खराब दुरावस्था..ग्रामपंचायतचे दुर्लक्ष…

नांदुर्खी बू.ग्रामपंचायतच्या अगदी शेजारीच असलेल्या लहान मुलांच्या अंगणवाडीची परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे.ग्रामस्थांनी अनेक वेळा अंगणवाडीची दुरुस्ती करावी याची मागणी केलेली आहे.पैसेही उपलब्ध आहेत.अंगणवाडीच्या समोरील खिडकीच्या काचा फुटलेल्या आहेत.अंगणवाडीचे कार्यालयावरील नावही गायब झाले आहे.अंगणवाडी समोर एक स्पष्ट असा बोर्ड असणे आवश्यक आहे.त्यावर अंगणवाडी भरण्याची वेळ,सुट्टी होण्याची वेळ या सर्व सुविधा असणे गरजेचे असताना व अगदी ग्रामपंचायत कार्यालया शेजारीच अंगणवाडी असून देखील दुर्लक्ष होत आहे.ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.लवकरात लवकर अंगणवाडीची जी दुरुस्ती करण्याची गरजेची असेल ती लवकरात लवकर पाहणी करून करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत..अंगणवाडी मध्ये लहान मुलांचा पोषण आहार ठेवलेला असतो.खिडकीच्या काचा फुटलेल्या असल्यामुळे बाहेरील धूळ त्या धान्यात जाण्याची भीती असते.बाहेरूनही कोणी काहि आतमध्ये फेकू शकते.व त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची भीतीही नाकारता येत नाही.त्यामुळे लवकरात लवकर योग्य पावले उचलून कार्यवाही करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button