फलटण:-‘मराठी साहित्यातील धनगर समाजाचे अंतरंग ..’ पुस्तकाचे प्रकाशन.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
‘मराठी साहित्यातील धनगर समाजाचे अंतरंग ..’ पुस्तकाचे प्रकाशन.
मराठीतील विविध साहित्यकृतींतून आलेल्या मेंढपाळांच्या भटकंतीमय जीवनातील चित्रणांचा डॉ. संदीप वाकडे यांनी ‘मराठी साहित्यातील धनगर समाजाचे अंतरंग’ या ग्रंथातून शोध घेतलेला असून सदर ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित ‘दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलना’मध्ये पार पडला.
या ग्रंथाचे प्रकाशन संमेलनाचे उद्घाटक आमदार लहूजी कानडे, संमेलनाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. किशोरजी सोनवणे, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबूराव उपाध्ये, डॉ. वंदनाताई मुरकुटे, डॉ. शिरीष लांडगे, श्री. भिला पाटील, प्रकाश कुलथे, हरिदास आखरे, अनिल लोखंडे, संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, ह. भ. प. दत्तात्रय बहिरट महाराज, डॉ. वसंतराव शेंडगे, ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री अर्जुन राउत व उपाध्यक्ष संदीप पटारे, प्रा. शरद दुधाट यांच्या उपस्थितीत इच्छामणी मंगल कार्यालय, श्रीरामपूर येथे पार पडले. लेखक डॉ. संदीप वाकडे यांनी ‘मराठी साहित्यातील धनगर समाजाचे अंतरंग’ या ग्रंथातून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व मानसिक अंगाने लोकजीवनाचा परामर्श घेतलेला आहे.