सातारा:-रणरागिणी विद्या शिंदे यांनी मारला साताऱ्यात आंदोलनाचा चौकार……
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
रणरागिणी विद्या शिंदे यांनी मारला साताऱ्यात आंदोलनाचा चौकार……
सातारा दि: मे .समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भागीदार व मालक यांच्या विरोधात तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सामाजिक कार्यकर्त्या विद्या रखमाजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलनाचा चौकार मारलेला आहे. या लक्षवेधी आंदोलनामुळे महिला सबलीकरण किती गुळगुळीत आहे. याचीच माहिती सर्वसामान्य जनतेला मिळत असल्याची टीका होऊ लागलेली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्त्या विद्या शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता लोकशाही मार्गाने मी आंदोलन करत आहे . जून २०२३ पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी उपोषण केले. या उपोषणामुळे माझ्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होत आहे. तरीसुद्धा माझे आंदोलन हे न्यायासाठी असल्याने मला नैतिक बळ मिळत आहे.
सदर मे समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भागीदार व मालक यांच्या विरोधात लेखी तक्रार करण्यात आलेली आहे. याबाबत टाऊन प्लॅनिंगचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितल्यामुळे मी आंदोलन स्थगित केले होते पण अद्यापही सदर अहवालाची प्रत मला मिळत नाही याचाच अर्थ मला न्याय देण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाची नाही त्यामुळेच मी पुन्हा एकदा लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे सध्या मला आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी अनेक पद्धतीने त्रास दिला जात आहे त्यामुळे मी आंदोलनापासून पुन्हा एकदा नव्या जोमाने न्याय हक्कासाठी उपोषण करत आहे दरम्यान याबाबत संबंधित अधिकारी व मे समर्थ बिल्डरला डेव्हलपर्स भागीदार व मालक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तांत्रिक अडचणीमुळे संपर्क होऊ शकलेला नाही.
————————————————
चौकट——- सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेले 53 दिवस लोकशाही मार्गाने आंदोलन होत आहे तर दुसऱ्या बाजूला एक मराठा युती आपल्या न्याय हक्कासाठी चौथ्यांदा उपोषण करून सुद्धा तिला न्याय मिळत नाही या दोन्ही बाजूस समोर आल्यामुळे सध्या जिल्हा प्रशासन अथवा सरकार हे कुणासाठी काम करत आहे ? हे अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे दिसून येत आहे
फोटो —सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलनाचा चौकार मारून बसलेल्या रणरागिनी सामाजिक कार्यकर्त्या विद्या शिंदे (छाया- निनाद जगताप सातारा)