कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न.
आश्रमशाळेत कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा.श्री.मधुसूदन मोहिते-पाटील (दादा)होते.
कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे आणि ग्रंथसंपदेच्या पूजनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. अंजली पवार हिने केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कविता , गंमतकोडी, भावगीते, संवाद ,लघुनाटिका, पोवाडा यांचे सादरीकरण केले.
माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. सर्व भाषांमध्ये सालंकृत भाषा म्हणजे मराठी त्यामुळे मराठी माणूस हा त्याचे वेगळेपण जपून आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा.श्री.मधुसूदन मोहिते-पाटील (दादा) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सादरीकरण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आपली भाषा, आपली संस्कृती हीचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे असे सांगितले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून ते मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यापर्यंतचा इतिहास सांगितला.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.दीपक माने सर, सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु.प्रणिता शिंदे हिने केले तर आभार कु. नंदिनी पवार हिने मानले.