पनवेल:-कोकण पदवीधर निवडणुकीत निरंजन डावखरे यांची हॅट्रिक निश्चित~ अनंत वारे -राष्ट्रवादी पदवीधर सेल.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
कोकण पदवीधर निवडणुकीत निरंजन डावखरे यांची हॅट्रिक निश्चित~ अनंत वारे -राष्ट्रवादी पदवीधर सेल.
महायुतीचे कोकण पदवीधर 2024 चे उमेदवार श्री निरंजन डावखरे यांच्या सोबतीला आता राष्ट्रवादी पदवीधर सेल ची पण ताकत जोडल्या मुळे या वेळेस हॅट्रिक निश्चित आहे असा विश्वास श्री अनंत वारे (प्रदेश उपाध्यक्ष -पदवीधर सेल )यांनी व्यक्त केला.
मा. अजित दादा पवार साहेब व कोकणचे भाग्यविधाते नवनिर्वाचित खासदार व प्रदेश अध्यक्ष सुनील जि तटकरे साहेब यांच्या आदेशा नुसार राष्ट्रवादी पक्ष व पदवीधर सेल पूर्ण ताकतीने प्रचारात उतरला आहे, कोकण विभागातील 5 हि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी हे प्रचार कामात उतरले आहेत.
2018 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला साधारण 15 हजार चे आसपास मतदान मिळाले होते, या निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी पदवीधर सेल तर्फे जास्तीत जास्त नवीन मतदार नाव नोंदणी करून घेण्यात आली आहे. या वेळेस राष्ट्रवादी चि हि हक्काची मते आता निरंजन डावखरे यांच्या पारड्यात पडणार आहेत व त्या करिता राष्ट्रवादी पक्ष व पदवीधर विभाग काम करत आहे.
मंत्री अदिती ताई तटकरे, युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण व प्रदेश सरचिटणिस शिवाजीराव गर्जे व प्रदेश सचिव शिवदास कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली पदवीधर सेल तर्फे निरंजन डावखरे याना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन सर्व विभागातील पदाधिकारी व पदवीधर मतदार याना करण्यात आले आहे.