गोरेगाव (वांगी):- सामजिक न्याय आणि अधिकरीता राज्यमंत्री मा. ना.श्री.रामदासजी आठवले सो. यांचे हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
RPS प्रतिनिधी : सौरभ चव्हाण

गोरेगाव (वांगी)
आज दि.१२/४/२०२२ रोजी मौजे गोरेगाव(वांगी) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मागासवर्गीय वस्तीत समाजमंदिराचे व दलीतवस्ती सुधार योजनेअंतर्गत बौद्ध वस्तीत रस्ता कॉक्रीटीकरण या विकास कामांचे उदघाटन करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नेते व वर्धन ऍग्रो
प्रो.लि.त्रिमली चे चेअरमन मा.श्री.धैर्यशिल दादा कदम हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते सातारा जिल्हा RPI चे अध्यक्ष मा.श्री.अशोकबापू गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य पर्यावरण आघाडी प्रदेशाध्यक्ष आर.पी.आय.पदी निवड झालेबद्दल त्यांचा नागरी सत्कार करणयात आला त्यावेळी मा.समाजकल्याण सभापती जि.प. सातारा मा.मानसिंगराव माळवे(आप्पा) मा.शिवाजीराव सर्वगोड, मा.श्री.भीमरावकाका पाटील सदस्य जि.प.सातारा, श्री. सागर शिवदास सदस्य जि.प.सातारा, मा.हिम्मतराव माने(बापू) मा.उपाध्यक्ष सातारा जिल्हा सहकार बोर्ड यांची विशेष उपस्थिती होती तसेच श्री.अजित नलवडे जिल्हा उपाध्यक्ष RPI,श्री.कुणाल गडाकुश जिल्हा उपाध्यक्ष RPI,श्री.अप्पासाहेब गायकवाड जिल्हा सरचिटणीस RPI,श्री.गणेश भोसले तालुका अध्यक्ष खटाव RPI,श्री.धनंजय चव्हाण भाजपा तालुका अध्यक्ष खटाव, श्री.रवींद्र कदम(दादा)माजी सरपंच गोरेगाव ,श्री.सुनील भालेराव(जेष्ठ नेते) मा.पंढरीनाथ भाग्यवंत बहुजन नेते व गोरेगाव वांगी सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गोरेगाव वि.का.स.सेवा सोसायटी चे व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ व सर्व ग्रामस्थ हे प्रमुख उपस्थित होते तसेच केंदीय मंत्री मा.आठवले साहेब हे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की गोरेगाव नगरी ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये समाजमंदिराचे उदघाटन माझा हस्ते करण्यात आले याचा मला सार्थ अभिमान आहे व त्यांनी या समाजमंदिरासाठी दोन कोटी रुपये तात्काळ मदत जाहीर केली आहे तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते व वर्धन ऍग्रो प्रो.लि. त्रिमली चे कार्यकारी संचालक मा.विक्रमशील कदम(बाबा) यांनी केले व कार्यक्रमाचे आभार सातारा जिल्हा युवक आघाडी RPI चे उपाध्यक्ष मा.मयुर(बाबा) बनसोडे यांनी मानले.
Vijaymali16092000
Thanku so much ❤️