कामोठे :-(जुई )- आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी महानगर पालिकेतून 7 फेब्रुवारी रोजी कॅम्पचे आयोजन.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
कामोठे :-जुई गावातील सर्व महिलांना
कळविण्यात येते कि, बुधवार दिनांक 7/2/2024 रोजी आपल्या गावात आयुष्यमान भारत कार्ड, काढण्यासाठी महानगर पालिकेतून कॅम्प लागणार आहे. या कार्डद्वारे 5 लाखापर्यंतचा मेडिकल खर्च मोफत होऊ शकतो. तो काढण्यासाठी येणाऱ्या महिलांनी आपला स्वतःच आधारकार्ड आणि आधारकार्ड ला लिंक असलेला मोबाईल नं ज्यात आहे तो मोबाईल सोबत घेऊन यावे.
हा कॅम्प बुधवार दिनांक 7/2/2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. त्यात दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत जेवणाची सुट्टी असेल तेव्हा कामकाज बंद असेल परत दुपारी 2 नंतर काम चालू होईल.
हा कॅम्प आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुई च्या वरच्या माळ्यावर ठेवण्यात आलेला आहे.
हा आयुष्यमान भारत कार्ड आपल्याच फायद्याचा असल्यामुळे आपल्या गावातील सर्व महिलांनी त्याचा फायदा घ्यावा. सर्वांनी आपली उपस्थिती दाखवावी असे महानगरपालिकेचे आवाहन.