आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे नवमतदार नोंदणी अभियान संपन्न.

प्रतिनिधी संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे नवमतदार नोंदणी अभियान संपन्न.
कराड,दि. 8 डिसेंबर 2022
श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर कराडच्या, उच्च शिक्षण मंडळ विद्यानगर कराडचे, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे निवडणूक साक्षरता मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व तहसील कार्यालय, कराड यांचे संयुक्त विद्यमाने नवमतदार नोंदणी व मतदानजागृती अभियान गुरुवार, दि. 8 डिसेंबर 2022 रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले.
सदर मतदार नोंदणी अभियानामध्ये मा. श्री युवराज पाटील, प्रभारी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय, कराड यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाईन मतदार नोंदणीबद्दल सविस्तर माहिती दिली. मतदानाचा अधिकार हा भारतीय नागरिकांना मिळालेला सर्वोच्च अधिकार असून समानता प्रस्थापित करणारा अधिकार आहे, तसेच वय वर्ष 18 पूर्ण असलेल्या प्रत्येक युवकाने मतदार म्हणून नोंदणी करणे हे भारतीय नागरिक म्हणून आपले आद्यकर्तव्य आहे, असे प्रतिपादन यावेळी मा. श्री युवराज पाटील यांनी केले.
मा. पाटील यांनी यावेळी वोटर हेल्पलाइन ॲपबद्दल
(Voter Helpline Application) सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर ऑफलाइन मतदार नोंदणीसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या अर्जांबद्दल ( Form No. 6,7,8 इ.) तसेच मतदार नोंदणी करताना आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या अभियानामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून आपली नोंदणी करावी तसेच आपल्या कुटुंबातील, शेजारी,  महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणी यांचीही मतदार म्हणून नोंदणी करावी व याबद्दल सर्वांमध्ये जागृतता निर्माण करावी असे आवाहन मा. युवराज पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
युवक हा समाजातील सर्वांत क्रियाशील घटक असून युवक समाजाला दिशा देण्याचे काम करतात, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून नोंदणी करावी असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.जी. जाधव यांनी केले.
या कार्यक्रमात  महाविद्यालयातील  राज्यशास्त्र विभागाकडून निवडणूक प्रक्रिया व मतदान याबद्दल भक्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. पी. पवार यांनी केले तर आभार  कु. अलिशा चव्हाण व सूत्रसंचालन कु. अल्फिया मुल्ला यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री शिवराज माळी, महसूल सहाय्यक कराड, महाविद्यालयाच्या जिमखाना उपाध्यक्षा श्रीमती एस. आर. सरोदे, प्रा. डॉ. आर.आर. थोरात, प्रा. डॉ. एन. ए. पाटील,
प्रा. श्रीमती एस.पी. पाटील, प्रा.श्रीमती एस. आर. पाटील प्रा. श्रीमती सरकाळे, प्रा. श्रीमती डांगे, प्रा. श्रीमती कांबिरे, प्रा. पी. एस. कराडे, प्रा. एस. एम. मुल्ला, प्रा. एस. एस. बोंगाळे, प्रा. ए. व्ही. माळी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button