आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-पुणे येथील अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत दहा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

पुणे येथील अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत दहा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर.

सातारा दि:
महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागाच्या पत्रकारांसाठी असलेल्या अधिस्विकृती समितीची दुसरी बैठक आज पुणे येथील विभागीय कार्यालयात झाली.
या बैठकीला समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे,सदस्य सचिव तथा पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉक्टर राजू पाटोदकर, समितीचे सदस्य गोरख तावरे ,चंद्रसेन जाधव ,सूनित भावे ,सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे ,पुणे जिल्हा माहिती अधिकारी मोघे, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के यांच्यासह माहिती उपसंचालक व तीनही जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील संबंधित कर्मचारी तसेच अधिकारी राहुल पवार व इतर उपस्थित होते.
बैठकीत सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील अकरा प्रस्ताव पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या समोर आले .त्यापैकी दहा प्रस्तावांना मंजुरी देऊन राज्य समितीकडे पाठवण्यात आले आहेत.राज्य समिती साठी पुणे विभागातून पत्रकारांच्या हिताचे काही ठराव ही पाठवण्यात आले .अधिस्वीकृती पत्रिका मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्र तपासणी करून त्याला मंजुरी देण्यात येते. ग्रामीण भागातील काही जेष्ठ पत्रकारांना अद्याप अधिकृत पत्रिका मिळाली नाही. काहींना आयकर भरत असल्याने सेवानिवृत्ती वेतन दिले जात नाही. याबाबत काही सुट देवून नव्याने नियमावली लागू करण्यात येण्यासाठी सद्यस्थितीत प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याबद्दल या समितीचे सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांच्या वतीने जेष्ठ पत्रकार बाळासाहेब आंबेकर, अजित जगताप व डायनेल खुडे मान्यवरांनी आभार मानले आहेत. सद्या रेल्वे प्रवास सवलत शुल्क अधिस्वीकृती पत्रकारांना मिळत नाही. ती पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे.
——————————————
फोटो -पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत चर्चा करताना मान्यवर

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button