श्रीरामपूर:- नगर शहर व श्रीरामपूर परिसरात चैन स्नॅचिंग करणारे 2 सराईत आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
श्रीरामपूर ( आर पी एस स्टार न्युज)- नगर शहर व श्रीरामपूर परिसरात चैन स्नॅचिंग करणारे 2 सराईत आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश.
श्रीरामपूर ( RPS स्टार न्युज)- नगर शहर व श्रीरामपूर परिसरात चैन स्नॅचिंग करणारे 2 सराईत आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून आरोपींकडून 15,07,000/- रुपये किंमतीचे 22.2 तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह, पल्सर मोटारसायकल, मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रशांत पुरुषोत्तम शर्मा वय 35, श्रीकृष्ण नगर, एकविरा चौक, नगर हे दिनांक 14/01/24 रोजी त्यांची पत्नीसह मोटार सायकलवर रस्त्याने जाताना काळे रंगाचे जर्किन व डोक्यात टोपी घातलेले अनोळखी 2 इसम काळे रंगाचे विना नंबर पल्सर मोटार सायकलवर येवुन फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यातील 52,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र ओढुन तोडून बळजबरीने चोरुन घेवुन गेले बाबत तोफखाना पो.स्टे.गु.र.नं. 61/2024 भादविक 392, 34 प्रमाणे चैन स्नॅचिंग जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
नगर जिल्ह्यात चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने मा. राकेश ओला, पोलीस अधीक्षक यांनी पोनि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना रेकॉर्डवरील आरोपींच्या शोधा करीता पथक नेमुण जिल्ह्यात घडलेल्या चैन स्नॅचिंगचे घटनांचा समांतर तपास करुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि. दिनेश आहेर यांनी दिनांक 21/01/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/संदीप पवार, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, देवेंद्र शेलार, विशाल गवांदे, पोना/ संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ/शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, आकाश काळे, अमृत आढाव व मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमुण ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक नगर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी नामे गणेश आव्हाड, रा. नागापुर व सागर नागपुरे रा. सावतानगर भिंगार यांचेवर संशय बळावल्याने त्यांचा शोध घेत असतांना पोनि. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संशयीत दोन्ही आरोपी काळे रंगाचे विना नंबर पल्सर मोटार सायकलवर भिस्तबाग परिसरात फिरत आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. पथकाने लागलीच भिस्तबाग येथे जावुन, सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे दोन्ही संशयीत आरोपी काळ्या रंगाचे पल्सर मोटार सायकलवरुन येताना दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना हात दाखवुन थांबण्याचा इशारा करुन थांबविले. संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) गणेश विठ्ठल आव्हाड वय 24, रा. गजानन कॉलनी, नवनागापुर, नगर व 2) सागर रमेश नागपुरे वय 30 रा. सावतानगर, भिंगार, नगर असे असल्याचे सांगितले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात सोन्याचे दागिने व 1 काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकल मिळुन आल्याने त्याबाबत ताब्यातील इसमांकडे विचारपुस करता त्यांनी नगर शहर, श्रीरामपूर व लोणी परिसरात चैन स्नॅचिंग करुन चोरी केलेले सोने आसल्याची माहिती दिली.
आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार नगर शहर, श्रीरामपूर, लोणी येथील एकूण 12 दाखल गुन्हे उघडकिस आले आहेत.
या 12 गुन्ह्यात चोरीस गेलेले 13,32,000/- 222 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1,50,000/- रुपये किंमतीची काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकल व 25,000/- रुपये किंमतीचे 2 मोबाईल फोन असा एकुण 15,07,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींचे ताब्यात मिळुन आल्याने दोन्ही आरोपींना तोफखाना पो.स्टे.गु.र.नं. 61/24 भादविक 392, 34 या गुन्ह्याचे पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी गणेश विठ्ठल आव्हाड हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द नगर जिल्ह्यात बलात्कार, पळवुन नेणे, जबरी चोरी, घरफोडी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे 10 गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी सागर रमेश नागपुरे हा देखील सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द नगर जिल्ह्यात गंभीर दुखापत व आर्म ऍ़क्टचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर, श्रीरामपूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदनगर, श्रीरामपूर व शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.