खटाव:-वडूज वकील संघटना अध्यक्षपदी ॲड.श्रीनिवास मुळे तर उपाध्यक्ष पदी ॲड.रोहन जाधव.
पत्रकार एकनाथ जाधव महाराष्ट्र राज्य विधी सल्लागार

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार एकनाथ जाधव महाराष्ट्र राज्य विधी सल्लागार
वडूज वकील संघटना अध्यक्षपदी ॲड.श्रीनिवास मुळे तर उपाध्यक्ष पदी ॲड.रोहन जाधव.
वडूज वकील संघटनेची सन २०२४/२०२५ ची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी ॲड.श्रीनिवास मुळे (पुसेगाव), उपाध्यक्ष पदी ॲड.रोहन जाधव(गुरसाळे)
तर सचिव पदी ॲड.सज्जन कदम (म्हासूर्णे) यांची बहुमताने निवड झाली.
वडूज वकिल संघटना यांची निवड प्रक्रिया नेहमीच चर्चेचा विषय असते परंतु या वर्षीची निवडणूक ही तिरंगी स्वरूपाची होती.यात अध्यक्ष पदासाठी ॲड.श्रीनिवास मुळे, ॲड. मार्तंड काळे, ॲड.प्रल्हाद सावंत उपाध्यक्ष पदासाठी ॲड.रोहन जाधव ,ॲड.संतोष कामाने तर सचिव पदासाठी ॲड.सज्जन कदम व ॲड.अनिकेत बोबडे यांचे अर्ज दाखल झाले होते. या निवडणुकीत १५५ लोकांनी आपला मतदानाचा अधिकार वापरला मतदान सकाळी ०८:००पासून दुपारी ०४:०० पर्यंत सुरू होते व संध्याकाळी ०४:०० ते ०५:०० मतमोजणी करण्यात आली यात ॲड. श्रीनिवास मुळे यांना ६७ मते, ॲड.रोहन जाधव ११३ मते तसेच ॲड.सज्जन कदम यांना १२५ मते मिळून बहुंमत सिद्ध करत विजय आपल्या पदरी पडला तसेच सहसचिव पदी ॲड. काजल बेलवडेकर,सदस्य पदी ॲड.अनुराधा देशमुख ( महिला प्रतिनिधी), ॲड.रमजान मुल्ला, ॲड.श्रेयस पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीस मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड.संतोष भोसले यांची तर निवडणूक अधिकारी म्हणून ॲड.कौस्तुभ ज्ञानसागर व ॲड.राहुल निकम यांची निवड करण्यात आली होती संध्याकाळी निकाल जाहीर होताच जल्लोषयचे वातावरण तयार झाले.
मागील निवडणूकी प्रमाणे या निवडणूकीतही मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटींग झाल्याने दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळाल्याची चर्चा आहे. या वेळीस सर्व सदस्यांनी निवडून आलेल्या उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.