पुणे :-निगडी:-ज्ञानदीप प्राथमिक शाळेमध्ये प्रथमदिनी ध्वजारोहण संपन्न.
प्रतिनिधी :-शफिक शेख निगडी:-9767275783

ज्ञानदीप प्राथमिक शाळेमध्ये प्रथमदिनी ध्वजारोहण संपन्न.
पुणे, निगडी, दि. 13 (शफिक शेख)ः- ‘‘आजादी का अमृतमहोत्सव’’निमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ध्वजारोहण करण्याच्या शासनाकडून करण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करीत आज 13 ऑगस्ट रोजी ज्ञानदीप प्राथमिक शाळेमध्ये रूपीनगर शिक्षण प्रसारक मंडळ सदस्य श्री. लक्ष्मण मुंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये आपल्या देशाविषयी आणि आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी ज्या सर्व धर्माच्या वीर क्रांतीकारकांनी आणि सर्व भारतीयांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव नेहमी विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच रहावी आणि देशासाठी त्याग आणि बलिदान करण्याची त्यांचीही मनोवृत्ती तयार व्हावी हा हेतू या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमातून साध्य करण्याचा प्रयत्न शाळेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी संस्थेचे चेअरमन सुभाष चौधरी, सहसचिव सुर्यकांत भसे, खजिनदार दशरथ जगताप सभापती रमेश भालेकर, सदस्य मंगेश नेरकर यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे नियोजन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नवले मॅडम आणि रूपा सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन म्हस्के सर आणि सांगले मॅडम यांनी केले. विशेष सहकार्य देवरे सर, गोरखनाथ सर, वाळकोली सर आणि पाटील सर यांनी केले. तसेच गणेश म्हस्के सर, राठोड सर, शिक्षक पालक संघ व शाळा समिती सदस्य यांनीही सहकार्य केले.