सातारा:-महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची बैठक सातारा येथे संपन्न.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची बैठक सातारा येथे संपन्न.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची बैठक आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी एक वाजता सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव भिसे, उपाध्यक्ष संपतराव मोहिते, मोहन खुडे, उत्तम भालेराव, सुनील खुडे,अभिजित संकपाळ, यांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यानंतर विश्वास मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांनी सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाच्या सातारा जिल्हा व्यवस्थापिका, महात्मा ज्योतिबा फुले विकास महामंडळाची सातारा जिल्हा व्यवस्थापक हेमंत खताळ, तसेच इतर अधिकाऱ्यांशी भेटी घेऊन विविध विषयावर चर्चा केली.