फलटण:-सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलचे निबंध स्पर्धेत उत्तुंग यश.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलचे निबंध स्पर्धेत उत्तुंग यश.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती फलटण आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित तालुकास्तरीय भव्य निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सदर निबंध स्पर्धेमध्ये सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे, सहकार महर्षी हनुमंतराव पवार हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण च्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले यामध्ये. इयत्ता आठवी ते दहावी या गटामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आर्या योगेश नाळे प्रथम क्रमांक,श्रेया विलास टिळेकर तृतीय क्रमांक, व साक्षी ज्ञानेश्वर माने तृतीय क्रमांक यांचा विभागून क्रमांक आला.
11 एप्रिल 2025 रोजी क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती दिवशी सायंकाळी पाच वाजता बक्षीस वितरण करण्यात आले.सदर बक्षीस वितरणाला प्रमुख पाहुणे म्हणून फलटण तालुका शहर पोलीस निरीक्षक मा.श्री.हेमंतकुमार शहा व जयंती उत्सव समितीचे तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला प्रशालेचे उपप्राचार्य सौ. रुपाली सस्ते, मार्गदर्शक शिक्षिका सौ. पल्लवी जगताप व सौ.जयश्री तांबे व पालक वर्ग उपस्थित होता.
विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्द्ल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.दिलीपसिंह भोसले (भैयासाहेब),संस्थेच्या सेक्रेटरी ॲड.सौ.मधुबाला भोसले ( भाभीसाहेब), संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.तुषार गांधी, प्रशासकीय अधिकारी सौ.स्वाती फुले मॅडम, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.नागेश पाठक सर, आनंदवन प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री प्रदीप चव्हाण. इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.