आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-बोलीभाषांमध्येच मराठी भाषेचा विकास : ३६ व्या साहित्य संवाद कार्यक्रमात साहित्यिकांचा सूर.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 फलटण:-बोलीभाषांमध्येच मराठी भाषेचा विकास :
३६ व्या साहित्य संवाद कार्यक्रमात साहित्यिकांचा सूर.

 संपादक प्रल्हाद चव्हाण

एकमेकांशी संवाद साधण्याचे प्रमुख साधन म्हणून भाषेकडे पाहिले जाते. संवाद साधताना आपण आपल्या मातृभाषेतून साधावा. मराठी भाषा ही अभिजात भाषा असून महाराष्ट्रात सुसंवाद साधण्याची एक प्रमुख भाषा आहे. मराठी भाषेची व्याप्ती वाढली तर सुसंवाद वाढेल. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात त्या बोलीभाषा व स्थानिक भाषा विकसित झाल्याशिवाय मराठी भाषा विकसित होणार नाही.बोलीभाषांमध्येच मराठी भाषेचा विकास आहे असा सामूहिक सूर नाना नानी पार्क फलटण येथील ३६ व्या साहित्य संवाद कार्यक्रमात उमटला.

यावेळी जेष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे , रवींद्र येवले , विक्रम आपटे , आशा दळवी , सुरेश भगत ,विनायक ननावरे, सुधीर इंगळे, विजया सुरवसे, राजाकुमार काकडे, प्रा डॉ अशोक शिंदे, संगीता वाघमारे, शुभांगी पुजारी, भारती जगदाळे, रोहिणी भंडलकर, हरिभाऊ जाधव बबनराव जाधव, आप्पासाहेब तांबे करिष्मा मुलानी, नरेंद्र वाघमारे, सचिन भांडवलकर अमोल जाधव, विक्रम भांडवलकर प्रा श्रेयस कांबळे यांच्या सह साहित्यिक व कवी उपस्थित होते.

फलटण तालुक्यातील साहित्यिक व साहित्य व प्रेमींचा या वेळी सन्मानपत्र व एक पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला. आभार श्रेयस कांबळे यांनी मानले.

चौकट
साहित्य संवाद…
फलटण मधील जेष्ठ व नव साहित्यिक दर महिन्याच्या २७ तारखेला फलटण येथील नाना नानी पार्क येथे जमतात यावेळी ठरवून दिलेल्या विषयावर साहित्यिक संवाद साधला जातो. रानकवी राहुल निकम , प्रा विकास शिंदे , जेष्ठ साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी एकत्र येऊन साहित्य संवाद ची स्थापना केली गेली तीन वर्षे हा संवाद अविरतपणे सुरू आहे

चौकट
साहित्य संवाद च्या लेखकांची प्रकाशने…
साहित्य संवाद या उपक्रमात फलटण तालुक्यातील ६० ते ६५ साहित्यिकांचा सहभाग असतो यामधील साहित्यिकांनी गेल्या तीन वर्षात ३० ते ३५ पुस्तकांचे प्रकाशन केले आहे हे साहित्य सवांद चे यश आहे

मराठी भाषेवर कितीही भाषांची आक्रमण झाले तरी मराठी भाषा इच्छा अस्तित्व कोणीही पुसू शकत नाही. त्यासाठी नवी पिढी तयार होत आहे. मराठी भाषेतील साहित्य हे जगातील वेगवेगळ्या भाषेत भाषांतरित झाले तर हे साहित्य जगभर पोहोचेल त्यामुळे मराठीचा अभिजात दर्जा अधिक उंचवून मराठीचा सन्मान होईल.
ताराचंद्र आवळे
माणदेशी साहित्यिक

मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली ही संस्था आज चांगले बळ घेत आहे. ग्रामीण नवं साहित्यिकांना यामधून प्रेरणा मिळते यामुळेच गेल्या तीन वर्षात साहित्य सवांद अविरतपणे सुरू आहे
प्रा विकास शिंदे
संस्थापक संयोजक साहित्य संवाद

मराठी भाषेतील अनेकविध पुस्तकांचे इंग्रजीत अनुवाद झाले पाहिजेत त्याच प्रमाणे बोली भाषांचा विकास झाला पाहिजे ज्या गतीने इंग्रजी साहित्य मराठीत अनुवादित झाले त्या गतीने मराठी साहित्य इंग्रजीत अनुवादित झाले पाहिजे
प्रा विक्रम आपटे
अनुवादक व साहित्यिक

मराठी भाषेत इतर भाषेचे शब्द येत आहेत ही सामाजिक व नैसर्गिक प्रक्रिया आहे भाषांमधील शब्दांचे एकमेकांत होणारे समावेशीकरणं भाषा विकसित होण्याचे लक्षण आहे ते नैसर्गिक पणे होऊन द्यावे असे वाटते
प्रा रविंद येवले
मा अध्यक्ष साहित्य परिषद फलटण

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button