ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माऊलीच्या पालखी सोहळ्यासाठी बरड नगरी सज्ज.

प्रतिनिधी:- समीरखान पठाण :-9766685375

माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी बरड नगरी सज्ज

फलटण ग्रामीण /समीर पठाण

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम रविवार दिनांक ३ जुलै रोजी बरड नगरीमध्ये होत आहे. या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शिवकुमार कोळी यांनी दिली.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी सोहळ्याच्या साठी बरड नगरी सज्ज झाली असल्याची माहिती उपसरपंच गोरख टेंबरे यांनी दिली.पालखी सोहळ्याच्या निमित्ताने बरड पालखी तळासह बरड गावा अंतर्गत रस्ते तसेच आजूबाजूचे रस्त्यांचे मुरमीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण गावामध्ये स्वच्छता करण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या वतीने २० डस्टबिन ठेवण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शिवकुमार कोळी यांनी दिली.गावातील सर्व विद्युत खांबावरती तसेच गावामधील सर्व मंदिरामध्ये नव्याने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पालखीतळाचे सपाटीकरण रुंदीकरण करण्यात आले आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावातील सर्व ठिकाणचे पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. गावामधून सर्वत्र फोगिंग मशीनच्या माध्यमातून धुराळणी करण्यात आली आहे. तेरा ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये एक हजार युनिटची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आनंद लंगुटे यांनी दिली.बरड गावांमध्ये प्रवेशाच्या ठिकाणची स्वागत कमानी वरती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. पालखी तळावरती ज्यादा विद्युत पुरवठा करण्यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पिण्याचे पाणी वारकऱ्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून टँकर भरण्यासाठी ११ ठिकाणी फिडींग पॉईंट उपलब्ध करण्यात आले आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button