खटाव:-मायणी परिसरात विजेचा खेळ खंडोबा,; नागरिक त्रस्त.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख:9890318605
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख
मायणी परिसरात विजेचा खेळ खंडोबा,; नागरिक त्रस्त. मायणी प्रतिनिधी_सध्या सूर्य आग ओकत आहे आणि तपमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस वर गेला आहे अशा परिस्थितीत मायणी परिसरात विजेचा खेळ खंडोबा झाला असून यामुळे नागरिक हैराण झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी मायणी येथून कलेढोण तरसवाडी पाचवड विखळे या भागाला वीजपुरवठा होतो सध्या मायनीत दिवसभर वीज पुरवठा खंडित झालेला असतो किंवा विजेचा लपंडाव सुरू असतो उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना घरात पंखा चालवावा म्हटले तर वीज गायब झालेली असते तसेच महावितरणचे अधिकारी लाइनमन वायरमन यांचे फोन बंद झालेले असतात तसेच अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर पेटलेले असतात अशा परिस्थितीत वितरण कंपनीने गंभीर दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी मागणी राजाराम कचरे यांनी केली आहे.