आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

गोरेगाव वांगी:-मा.श्री.धैर्यशील दादा कदम बी.जे.पी.सातारा जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते वर्धापन दिन आणि संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न.

पत्रकार प्रियदर्शनी चोरगे

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार प्रियदर्शनी चोरगे महिला क्राईम & इन्वेस्टीगेशन ऑफिसर महाराष्ट्र राज्य

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

गोरेगाव वांगी:-मा.श्री.धैर्यशील दादा कदम बी.जे.पी.सातारा जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते वर्धापन दिन आणि संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न.

 

रविवार दि- 20

एसीएलएस इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि आरपीएस स्टार न्युज ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली या ठिकाणी नोंदणी असलेले डिजिटल मीडिया ) चे वर्धापन दिन आणि संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माननीय धैर्यशील दादा कदम जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सातारा तसेच वेताळभक्त गुरुवर्य दादा महाराज गोरेगाव वांगी, माननीय श्री हिम्मतराव माने( बापू) सातारा जिल्हा सहकार बोर्ड मा.उपाध्यक्ष, माननीय श्री अविनाश वाघमारे साहेब पोलीस उपनिरीक्षक पुसेसावळी, माननीय श्री फुल माळी पोलीस पाटील गोरेगाव वांगी, माननीय श्री विक्रम महांगडे पश्चिम महाराष्ट्र भाजपा कार्यकारणी सदस्य, मा.रवींद्र कदम दादा मा.सरपंच गोरेगाव वांगी, ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सर आणि राष्ट्रीय अध्यक्ष संपादक मा.श्री प्रल्हाद चव्हाण साहेब त्यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
याप्रसंगी बोलताना माननीय श्री अविनाश वाघमारे साहेब पोलीस उपनिरीक्षक पुसेसावळी यांनी RPS STAR NEWS चे वर्धापनदिनांनी संपर्क कार्यालयाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. हे बोलत असताना त्यांनी पोलीस प्रशासनातील काही गोष्टी आणि समाजातील गोष्टी यांचा समन्वय साधून प्रसारमाध्यमांनी त्यातील तथ्यता पडताळून बातमी प्रसिद्ध करावी, पोलीस प्रशासन आपल्याबरोबर 24 तास कार्यरत असेल अशी ग्वाही दिली. ज्या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्षांनी संपादक प्रल्हाद चव्हाण यांनी या कार्यालयाची स्थापना केलेली आहे. अर्थात अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार पीडित लोकांना मदत करणे त्यांना न्याय मिळवून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. संघटनेचे मुख्य ब्रीदवाक्य मार्ग विश्वासाचा न्याय करता हाक द्या वाटेल तेथे साथ घ्या! या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही असे मा.श्री. अविनाश वाघमारे साहेब पोलीस उपनिरीक्षक यांनी शब्द दिला. गोरेगाव वांगी सारख्या छोट्याशा गावामध्ये आपण लोकांसाठी संघटनेचे व्यासपीठ तयार करून दिले त्याबद्दल वाघमारे साहेब यांनी प्रल्हादजी चव्हाण त्यांचे आभार व्यक्त केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलताना माननीय श्री धैर्यशील दादा कदम भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष यांनी बऱ्याच विषयावरती चर्चा केली.गोरेगाव वांगी तील गायरानाचा प्रश्न असेल, पाणी बचाव मोहीम असेल, रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रकल्प असतील अशा विविध गोष्टींवर चर्चा करत गोरेगाव वांगी या ठिकाणी आरपीएस स्टार न्युज च्या वर्धापन दिन आणि संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी या माझ्या गावाशी माझी नाळ जोडली गेली आहे. खर्‍याला खरं आणि खोट्याला खोटं बोलण्याची खरी दमक लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ मध्येच आहे आणि हे करण्यासाठी प्रल्हादजी चव्हाण यांनी हे व्यासपीठ निर्माण करून दिले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.तसेच राष्ट्रीय अध्यक्ष संपादक मा श्री प्रल्हाद चव्हाण साहेब आणि सर्व पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. ज्यावेळीही आपल्याला माझी गरज पडेल त्यावेळी आपल्याबरोबर मी उभा असेल अशी ग्वाही मा.श्री.धैर्यशील दादा कदम यांनी दिली.तसेच पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष यांचेही मा.श्री.धैर्यशील दादा कदम यांनी कौतुक केले.

याप्रसंगी गोरेगाव वांगी येथील सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत गोरेगाव वांगी चेअरमन वाईस चेअरमन संचालक विकास सेवा सोसायटीचे सभासद उपस्थित होते.

 

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button