पुणे निगडी:-अखेर महापालिकेला जाग आली आणि से. 22 मधील ड्रेनेज कामास सुरूवात झाली.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
…अखेर महापालिकेला जाग आली आणि
से. 22 मधील ड्रेनेज कामास सुरूवात झाली
निगडी, दि. 28 (शफिक शेख) :- अमृत योजनेअंतर्गंत निगडी विभागातील से.२२ मधील ड्रेनेज लाईनच्या कामास मंजुरी मिळाली होती. मंजुरी मिळून देखील काम सुरू न करता नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी तक्रार दिपक खैरनार यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्याचे वृत्त दिनांक 21/2/2023 रोजी आमच्या प्रतिनिधीमार्फत RPS STAR NEWS वर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या तक्रारवजा वृत्ताची दखल महापालिका आयुक्तांकडून घेण्यात आली असून ड्रेनेज लाईनच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांकडून RPS STAR NEWS आणि श्री. खैरनार यांचे आभार मानले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमृत योजनेअंतर्गंत निगडी विभागातील से.२२ मधील ड्रेनेज लाईन टाकण्याबाबत कामाचा आदेश देण्यात आला होता. परंतू कामाचा आदेश होऊन देखील गेले अनेक महिन्यांपासून ठेकेदाराकडून काम करण्यास टाळाटाळ केली जात होती. नागरिकांनी अनेवेळा तक्रारी करून देखील ड्रेनेज कामाची स्थिती ‘जैसे थे’ अशी होती. याची खैरनार यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करत कामास विलंब करणारे ड्रेनेज विभागातील सह शहर अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच ठेकेदारावर कडक कारवाई करून तात्काळ कामाची सुरूवात करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
तक्रारीनंतर अखेर ड्रेनेज लाईनच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदार तक्रारीची वाट पहात होता का? आणि जर तक्रारच केली नसती तर ठेकेदाराने काम सुरू केले असते का? असे विविध प्रश्न उपस्थित होत असल्याचे खैरनार यांनी म्हटले असून हा कामे न करता बिले लाटण्याचा प्रकार दिसत आहे, त्यामुळे दंडात्मक कारवाई करून काम पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदारास बिल अदा करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.