सातारा:-नागठाणे ग्रामपंचायती च्या लकी ड्रॉ योजनेस ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
नागठाणे ग्रामपंचायती च्या लकी ड्रॉ योजनेस ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद.

सातारा:-नागठाणे ग्रामपंचायतीच्या वतीने १५ ऑगस्ट २०२५ ते २५सप्टेंबर २०२५अखेर सन २०२५ /२६अखेर ची घरपट्टी व पाणीपट्टी भरणा करणाऱ्या करदात्यांसाठी भव्य आणि दिव्य अशा प्रकारची सुमारे ७६ बक्षीसाची लकी ड्रॉ योजना लोकसहभागातून तसेच ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच व त्यांचे सर्व सहकारी यांच्या स्वह खर्चातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या लकी ड्रॉ योजनेची सोडत आज गुरुवार दि. २३/०९/२०२५ रोजी नागठाणे ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये संपन्न झाली.
या कार्यक्रमासाठी नागठाणे गावातील सर्व बक्षीस दाते, व्यापारी, युवा उद्योजक, तसेच शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असणाऱ्या विकास सेवा सोसायटी नं.१व २विद्यमान चेअरमन,व्हा. चेअरमन, व त्याचे सर्व संचालक मंडळ, व नागठाणे ग्रामपंचायतच्या सरपंच व त्यांचे सर्व सदस्य, कर्मचारी नागठाणे गावातील सर्व आजी-माजी सैनिक, सर्व अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
अत्यंत पारदर्शक पद्धतीने या लकी ड्रॉ योजनेची सोडत सर्व ग्रामस्थांच्या समोर चिठी काढून करण्यात आली. तसेच भाग्यवान विजेत्यांना सर्व करदात्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हा लकी ड्रॉ सोहळा संपन्न झाला. या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व करदात्यांना हमखास गिफ्ट बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करण्यात आलेमुळे ग्रामस्थां कडून कौतुक करण्यात आले. नागठाणे ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.रूपालीताई बेंद्रे मॅडम यांच्याकडून सर्व कर दात्यांचे आभार मानण्यात आले.




