लोणंद:-फातिमा शेख यांना जयंतीनिमित्त लोणंद येथे अभिवादन.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
फातिमा शेख यांना जयंतीनिमित्त लोणंद येथे अभिवादन.
लोणंद :
समाजसुधारक व शिक्षिका फातिमा शेख यांची 192 वी जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणंद येथे साजरी करण्यात आली प्रसंगी सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .याप्रसंगी विद्यार्थीनी कुमारी माहिरा इम्रान पिंजारी इयत्ता दुसरी अ ही फातिमा शेख यांच्या वेशभूषेत मध्ये होती. उपक्रमशील शिक्षिका सौ मृणाल जाधव यांनी फातिमा शेख यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला .
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सौ सुचेता हाडंबर मॅडम, अमरीन मुलाणी ,( इनामदार ), प्रवीण क्षीरसागर,धनंजय जाधव व अजित जाधव हे मान्यवर उपस्थित होते. अमरीन मुलाणी (इनामदार)मॅडम , यांच्या स्कूल ऑफ टेकनोलॉजि संस्थेच्या माध्यमातुन लोणंद परिसरातील दोन हजार पेक्षा अधिक महिला व मुलींना प्रशिक्षण देण्यात आले
याकार्याची दखल घेऊन सुजन संस्था यांच्या वतीने जिजाऊ सावित्री फातिमा पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला.उपस्थित मान्यवरांना जागरूक पालक यशस्वी बालक व मातृत्वाचा पाझर ही पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले.संतकृपा बेकरीचे मालक श्री प्रवीण क्षीरसागर यांनी मुलांना खाऊ देऊन कौतुक केले .शिक्षक श्री धनंजय जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.
आदर्श शिक्षिका सौ मृणाल जाधव व धनंजय जाधव तसेच सुजन संस्था यांच्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.