आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-हरेगाव येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा ख्रिस्तावासी रे फा वसंत सोनवने यांच्या स्मरणार्थ मोठ्या उत्साहात साजरा ……

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

हरेगाव येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा ख्रिस्तावासी रे फा वसंत सोनवने यांच्या स्मरणार्थ मोठ्या उत्साहात साजरा ……

श्रीरामपुर / माळेवाडी ( प्रतिनिधी )
संत तेरेजा शैक्षणिक शैक्षणिक संकुलातील संत तेरेजा उच्च माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक ख्रिस्तवासी रे .फा.वसंत सोनवणे यांच्या स्मरणार्थ माजी विद्यार्थी बॅच २००४ -०५ स्नेहमेळावा दिनांक २४ मे २०२६ रोजी संत तेरेजा हॉच हरेगाव येथे आयोजित करण्यात आला होता .
या स्नेहमेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रजा जागृती शिक्षण संस्थेचे सह सचिव व संत तेरेजा शैक्षणिक संकुलाचे सुपरवायझर रे फा फ्र फ्रान्सिस ओहळ तर अध्यक्षस्थानी संत तेरेजा बॉईज हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक श्री सचिन शिंगाडे सर , प्रा भाऊसाहेब तोरणे सर , माजी शिक्षक श्री पाळंदे सर , शामुवेल राठोड , उपस्थित होते या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक व विद्यार्थी यांची मिरवणूक काढून संत तेरेजा हॉलमध्ये प्रवेश केला . सर्वाचे शॉल व ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला . तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी रुमाल व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले यावेळी अध्यक्षीय भाषणात आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की मी जरी शाळेचा प्राचार्य असतो तरी मला सर्वसामान्य माणूस म्हणूनच आवडते कारण आजपर्यंत प्राचार्य पदाचा मान फक्त धर्मगुरूंचाच आहे आणि त्यांचाच राहील मला प्राचार्य पद लाभले तरी आपण धर्मगुरू इतके मोठे कधीच नाही आणि आजपर्यंत मला कोणते धर्मगुरू ओळखत नाही असे कधी होत नाही आपली हरेगावची मतमाऊली कोणालाही कधीही काहीही कमीत कमी पडू देणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना म्हटले की फा फ्रान्सिस म्हटले की मी देखील संत तेरेसा बॉईज हायस्कूलचा विद्यार्थी आहे शाळा आणि कॉलेजची शिस्त आत्मविश्वास आणि जिद्द कधीही कमी पडू देणार नाही कारण शाळा ही फक्त इमारत नाही तर ती एक संस्काराची जागा आहे प्राध्यापक तोरणे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे सर्व सचिव ख्रिस्तवासी धर्मगुरू व शिक्षण यांना आदरांजली वाहून सर्वांना आठवणीत ठेवले विद्यार्थ्यांची वर्गातील शिस्त आणि ख्रिस्तवासी फा . वसंत सोनवणे यांचे शिक्षकांच्या पाठीशी असलेले पाठबळ याविषयी माहिती दिली .
श्री पाळंदे सरांनी कॉलेचची उभारणी करण्यात आलेल्या अडचणी व सर्व शिक्षकाचा कॉलेजसाठी केलेला त्याग यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले तर मुख्याध्यापक शिंगाळे सर व शामुवेल राठोड , गिता हिवाळे मॅडम , शामल साळवे मॅडम ‘ राणी वैजापूरकर मॅडम , अगाथा मॅडम , पडघडमल मॅडम यांनी यांनी विद्यार्थ्यांना स्नेहमेळावा २००४ -०५ बँचच्या विद्यार्थ्यंनी मनोगत व्यक्त केले त्यामध्ये मनीषा नाईक , नाईक संगीता नाईक ‘मनीषा चौधरी ,स्नेहल कदम पल्लवी पाटोळे ‘ सॅमसन पठारे , विश्वास खरात , प्रेमचंद वाघमोरे , नाना शिंदे सुवास धनेधर ‘उमेश साळवे , आमिर देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अतिशय धार्मिक शब्दात आपले मनोगत व्यक्त केले तसेच यावेळी गौतम आल्हाट विश्वजीत अल्हाट पंकज बोधक अतुल पंडित राहुल वाघ कांचन कावडवाले योगिता नाईक माधुरी गोरे मनीषा भोसले उज्वला नाईक आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक विश्वास खराब यांनी सूत्रसंचालन दीपक नागरे यांनी केले तर आभाराचा गोड कार्यक्रम राहुल वाघ यांनी पार पाडला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button