क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण घटनेतील आरोपी निर्दोष सुटल्यावर जबाबदार कोण? रमेश उबाळे यांचा सवाल.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत

फलटण घटनेतील आरोपी निर्दोष सुटल्यावर जबाबदार कोण? रमेश उबाळे यांचा सवाल.

फलटण दि: संपूर्ण देशामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येने सातारा जिल्ह्यातील काळी बाजू प्रकाशात आलेली आहे. याबाबत अनेक संघटनेने निषेधार्थ आंदोलन केले. तरी ही पुराव्या अभावी व राजकीय दबावापोटी संबंधित आरोपी निर्दोष सुटले तर त्याला जबाबदार कोण? असा सर्वांनाच आत्मचिंतन करणारा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते व पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी उपस्थित केलेला आहे. या पाठीमागे वस्तुनिष्ठ पुराव्याने न्याय मिळावा. हीच प्रामुख्याने मागणी आहे.


याबाबत माहिती अशी की, फलटण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या २८ वर्षाच्या डॉ. संपदा मुंडे यांनी आपल्या हाताच्या पंजावर पेनाने मजकूर लिहून फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांच्या मृत्यूदेह पाहून पोलीस यंत्रणा व घटनास्थळी त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचेच हृदय पिळवटून निघाले होते. या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या सर्वच घटकाची निपक्षपातीपणाने चौकशी पूर्ण झाल्यानंतर वस्तू स्थिती जनतेसमोर येणार होती. त्यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी एकतर्फी पुराव्या अभावी न्यायाधीश असल्यासारखी भूमिका घेतली .
या प्रकरणाबाबत भाजपचे माजी खासदार व विद्यमान फलटणचे महायुतीचे आमदार यांचा उल्लेख करून ते निर्दोष असल्याचा बेकायदेशीर आपल्या राजकीय भाषणातून निकाल दिला. अशी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेली आहे. याबाबत अनेक कायदे तज्ञांनीही फलटणच्या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नवल व्यक्त केले आहे. पोलीस तपास यंत्रणेचे मनोधैर्य कमी करण्यासाठी फलटण येथे जाऊन मुख्यमंत्री सारख्या जबाबदार व्यक्तींनी एका लाडक्या बहिणी व त्यांच्या कुटुंबीयांवर दिवाळीच्या सणाला झालेला आघात याचे विश्लेषण करणे गरजेचे होते. परंतु, दुसऱ्याच्या राजकारणाला टीकाटिपणी करताना आपणही राजकारण करत आहोत. हे सुद्धा नकळत त्यांनी सिद्ध केले आहे.
विरोधी पक्ष नेता असताना घेतलेली आक्रमक भूमिका अनेक प्रकरणांमध्ये दिसून आली. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका ही महिला वर्गाला पटलेली नाही. अनेक महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली . आरोपी अजून पोलीस कोठडीत असताना सुद्धा जाहीरपणाने याबाबत मुख्यमंत्र्यांनी आरोपीबाबत घेतलेली भूमिका योग्य नाही.अशी असह्यताही दाखवून दिली आहे.
सदर घटना घडल्यानंतर याबाबत डॉ. संपदा मुंडे व संबंधित आरोपी यांनी एकमेकांबद्दल केलेल्या लेखी तक्रारी आणि त्या अनुषंगाने वैद्यकीय खाते व पोलीस यंत्रणा यांनी आपले म्हणणे मांडले आहे. महिला आयोग व अनेक सामाजिक संघटनेने याबाबत प्रश्न उपस्थित केले. तरीसुद्धा मुख्यमंत्री म्हणून राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पाझर फुटला नाही. हम करे सो कायदा…. देशांमध्ये सुरू आहे.
त्याचीच झलक पाहण्यास मिळाली. पूर्वी न्यायालयवर विश्वास ठेवून एखाद्या वेळी दोषी सुटला तरी चालेल पण निर्दोष व्यक्तीवर अन्याय होऊ नये. असा प्रचलित समज करण्यात आला होता. आता मात्र सत्ताधारी पक्षातील व्यक्ती निर्दोष सुटू शकतो. अशीच चर्चा रंगू लागलेली आहे.
अगोदर पहिली सत्य घटना समजून घ्या आणि त्यानंतर त्याचा योग्य उपयोग किंवा विपर्यास करा. अशा पद्धतीने काही समाज माध्यमातून वार्तांकन झालेले आहे. त्यांच्याही कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. हे सामाजिक जाणीव पोकळ करण्याचा प्रकार आहे. याबाबत चिंता वाटत आहे. असे श्री रमेश अनिल उबाळे यांनी खंत व्यक्त केली आहे.
पहिली घटना विसरून जाण्यासाठी दुसरी घटना आवश्यक असते. अशा पद्धतीने पाठ शिवणीचा खेळ देशभरात सुरू आहे. त्याला फलटणची घटना अपवाद नाही. तपास यंत्रणेने सर्व पुराव्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीचा
निपक्षपातीपणाने न्यायालयात पुरावा सादर करून एक आव्हान म्हणून या घटनेकडे पहावे.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचा पुरेपूर वापर करून डॉ .पंकजा मुंडे यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक आरोपीला त्यांच्या सहभागातील हिश्याप्रमाणे शिक्षा मिळावी. महाराष्ट्रातील अनेक संघटना प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यांना यश मिळेपर्यंत हा लढा लढला जाईल. असाही विश्वास श्री रमेश अनिल उबाळे यांनी व्यक्त केला आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button