ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
*वैजापुर तालुक्यातील सिरसगाव व परिसरात चोरीचे सञ सुरु असल्यामुळे विरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत नागरिकांना सतर्क रहाण्याचे आव्हान व ग्रामरक्षक दलातील तरुणांना काठी व सिट्टीचे वाटप*
प्रतिनिधी:- सचिन मोईन औरंगाबाद

वैजापूर:- विरगाव पोलीस स्टेशन हद्दीत मौजे सिरसगाव व परिसरात चोरीचे सञ सुरु असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार नरवडे यांनी दि 30/5/2022 सोमवार रोजी सायकांळी सहा वाजेच्या दरम्यान सिरसगाव येथिल नागरिकांची भेट घेऊन सतर्क रहाण्याचे आवाहन केले आहे. तसेच ग्रामरक्षक दलातील तरुणानां मार्गदर्शन करुन ग्रामरक्षक दलातील तरुणानां पोलीस स्टेशन अंतर्गत काठी व सिट्टीचे वाटप करण्यात आले आहे. त्यावेळी गावचे पोलीस पाटील महेश निंबाळकर व तंटामुक्ती अध्यक्ष अमोल धात्रक व ग्रामरक्षक दलाचे अध्यक्ष गणेश निंबाळकर उपाध्यक्ष विशाल धात्रक पोलिस मित्र संघटनेचे तालुका अध्यक्ष मजनू पठाण गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.