कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कन्नड:- छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्हा जोडणारा कन्नड घाट आज पासून जड वाहनांसाठी बंद.

पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर

कन्नड घाट आज पासून जड वाहनांसाठी बंद. गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगर ते जळगाव जिल्ह्याला जोडणारा कन्नड घाटात सतत वाहन कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत होता. दरम्यान, दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान संभाजीनगर खंडपीठाने कन्नड चाळीसगाव दरम्यानचा कन्नड घाट 11 ऑगस्ट पासून काही अपवाद वगळत जड वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आज पासून कन्नड घाटात जड वाहतुकीला बंदी असणार आहे. विशेष म्हणजे यासाठी संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी बंदी असलेल्या वाहनांसाठी पर्यायी तीन मार्ग दिले आहे. तर या बंदीच्या काळात उपाय योजना म्हणून ठीक ठिकाणी पोलीस पॉईंट आणि पेट्रोलिंग वाहनांची तैनाती करण्यात आली आहे. कन्नड घाटातील वाहतूक कोंडीवर संभाजीनगर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. न्यायालयाने संभाजीनगर ते चाळीसगाव दरम्यानचा घाटतील वन्यजीव प्राण्यांचे संरक्षण व सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास असल्यामुळे घाटातील जड वाहतूक आजपासून बंद केली आहे. तसेच याबाबत प्रभावी अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाकडून संबंधित मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही आणि दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत चालू राहील याकरिता संभाव्य अडचणीची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेण्यात आला आहे. तसेच तीन पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. * असे असणार पर्यायी मार्ग* पूर्वीचा मार्ग: संभाजीनगर ते कन्नड ते चाळीसगाव धुळे जाणारा जड वाहतुकीचा मार्ग * आताचा मार्ग*: संभाजीनगर ते दौलताबाद टी पॉइंट- कसाब खेडा- शिऊर बंगला- तलवाडा- नांदगाव मार्गे 2) पूर्वीचा मार्ग: चाळीसगाव ते कन्नड ते औरंगाबाद येणारी जड वाहतूक पर्यायी मार्ग: चाळीसगाव ते नांदगाव ते तलवाडा ते शिऊर बंगला ते कसाब खेडा ते दौलताबाद टी पॉइंट ते संभाजीनगर 3) पूर्वीचा मार्ग: जळगाव ते सिल्लोड ते फुलंब्री ते ते खुलताबाद मार्गे कन्नड कडे जाणारी जड वाहतूक पर्यायी मार्ग: जळगाव सिल्लोड फुलंब्री संभाजीनगर मार्गे दौलताबाद टी पॉइंट कसाब खेडा शिऊर बंगला नांदगाव मार्गे चाळीसगाव असे जड वाहन जातील. पोलिसांकडून असे असणार बंदोबस्त, छत्रपती संभाजी नगर ते कन्नड NH52 रोडवर जड वाहतूक बंद करण्याकरिता दौलताबाद टी पॉइंट, कसाब खेडा टी पॉइंट, देवगाव रंगारी टी पॉइंट, शिऊर बंगला टी पॉईंट, पाणपोई फाटा, तेलवाडी फाटा, पीशोर नाका हे पॉईंट निवडलेले असून सदर ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासाठी 50 बॅरिकेट्स, तीन क्रेन्स, वीस पोलीस अमलदार राखीव ठेवण्यात आले आहेत. सतत पोलिसांची पेट्रोलिंग चालू राहणारआहे. याची प्रवाशांनी व नागरिकांनी नोंद घ्यावायची आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button