आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मायणी येथे नवागत विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व स्वागत.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी येथे नवागत विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व स्वागत.

मायणी, प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या आनंद इंग्लिश स्कूल व भगतसिंग प्राथमिक विद्यालय, मायणी येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. वाद्यांच्या गजरात, पुष्पवृष्टी तसेच पारंपरिक औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आल्याने विद्यालय परिसर आनंदमय वातावरणाने फुलून गेला.
यावेळी पंचायत समिती सदस्य सौ. अनिता कोळी, त्यांचे प्रतिनिधी संभाजी कोळी तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष राजाराम कचरे यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कार्यक्रमाला अनफळे, ढोकळवाडी, कान्हरवाडी व मायणी परिसरातील ग्रामस्थ, पालक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील येलमर, दीपक खलीपे, शिक्षकवृंद, संस्थेचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व प्रेरणादायी व्हावी, तसेच शाळेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता निर्माण व्हावी, या उद्देशाने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल उत्सुकता आणि आत्मविश्वास वाढल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. शेवटी दीपक खलीपे यांनी उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button