सातारा:-सातारा जावळी थेंबे थेंबे तळे साचे चा अनुभव …..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारा जावळी थेंबे थेंबे तळे साचे चा अनुभव …..
सातारा दि: सध्या प्रचार यंत्रणा खेड्यापाड्यात पोहोचले आहे. प्रचारामध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्ते उतरले आहेत. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने एकटा कार्यकर्ता सुद्धा हातात मशाल घेऊन इमानदारीने प्रचार करत आहेत. त्यामुळे मशालच चिन्ह प्रत्येक घरामध्ये अस्मितेचे प्रतीक बनले आहे. ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये व शिवारात काम करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील मतदारांना सुद्धा आता मशालचिन्ह प्रिय वाटू लागलेले आहे. खऱ्या अर्थाने विकासासाठी दिलेले मत कधीही वाया जाणार नाही. एकटा कार्यकर्ता सुद्धा गावागावांमध्ये वाड्या वस्तीत फिरून मशाल चिन्हाचा प्रचार करत आहे. थेंबे थेंबे तळे साचे पद्धतीने मतदारांच्या मतदानाने विजय निश्चित होणार आहे. प्रचारानिमित्त मशाल चांगलीच पेटून प्रकाशमान झालेले आहे. या प्रकाशात अनेकांचे भव्यतव्य उजाळून निघणार आहे. सध्या कुडाळ, सायगाव, सोनगाव, आलेवाडी ,मेढा, करंजे, सावली, केळघर, वरोशी ,नांदगणी, केडंबे, गोंदे माळ परिसरामध्ये आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वच कार्यकर्ते झटत आहेत.